मिझोराम : मिझोराममधून एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. मिझोराममध्ये एक बांधकाम सुरू असलेला रेल्वे पूल कोसळला आहे. या अपघातात जवळपास १७ कामगारांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ही संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी प्रशासनाकडून मदकार्य सुरू आहे.
सकाळी १० वाजता राजधानी आयझॉलपासून २१ किमी अंतरावर सायरंगजवळ हा अपघात घडला आहे. बैराबी ते सायरंगला जोडणाऱ्या कुरुंग नदीवर हा पूल बांधणे सुरु होते. घटना घडली त्यावेळी पुलावर ३५ ते ४० काम करत होते.