Zilla Parishad Bharti 2023 : राज्यातील गट “क” संवर्गातील १९४६० रिक्त जागांसाठी भरती

21 Aug 2023 18:48:46
Zilla Parishad Bharti 2023 In Maharashtra

मुंबई :
सर्वजण आतुरतेने वाट पाहत असलेल्या जिल्हा परिषदेच्या १९४६० पदांसाठी मेगा भरतीला सुरुवात झालेली असून सर्व जिल्हा परिषदेच्या जाहिराती प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत. आयबीपीएस मार्फत ऑनलाईन अर्जाला सुद्धा आजपासून सुरुवात झालेली असून २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत दिली आहे.

गट “क” संवर्गातील जवळपास १८ वेगवेगळ्या पदांसाठी ह्या भरत्या असून या सर्व भरत्या सरळसेवेने भरल्या जाणार आहेत राज्यातील एकूण ३४ जिल्हा परिषदांमध्ये “क” संवर्गातल्या १९४६० रिक्त जागांसाठी ५ ऑगस्ट पासून जाहिरात प्रसिद्धी तसेच ऑनलाईन अर्ज आयबीपीएस मार्फत सुरू केलेले आहेत.

खाली सर्व जिल्ह्यानुसार त्यांच्या जागा आणि जाहिराती दिलेल्या आहेत खालील लिंक वरून तुम्ही त्या जाहिराती आणि रिक्त जागांचा तपशील पाहू शकता आणि ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक जागा आहेत तिथे पाहून अर्ज करू शकता किंवा ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला नोकरी मिळण्याची शाश्वती असेल अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता.


Powered By Sangraha 9.0