बिहार सरकारने 'अटल बिहारी वाजपेयी पार्क'चे नाव 'कोकोनट पार्क' केले, नितीशकुमार म्हणायचे- 'पूज्य अटलजी'

    21-Aug-2023
Total Views |
Patna's Atal Bihari Vajpayee Park renamed Coconut Park by Tej Pratap

पाटना : बिहारची राजधानी पाटना येथील कंकड़बाग येथे असलेल्या 'अटल बिहारी वाजपेयी पार्क'चे आता 'कोकोनट पार्क' असे नामकरण करण्यात आले असून राज्याचे पर्यावरण मंत्री तेज प्रताप यादव यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार अनेकदा माजी पंतप्रधान अटल बिहारींना 'पूज्य अटलजी' म्हणून संबोधित करतात.त्यांची प्रशंसा करतात. मात्र या घटनेने त्यांची बेगडी श्रद्धा लोकांसमोर आली आहे. बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार आहे, ज्यामध्ये आरजेडी-जेडीयू-काँग्रेसचा समावेश आहे. केंद्रात विरोधी पक्ष असूनही नितीश कुमार यांनी अटलबिहारी वाजपेयींचे अनेकदा कौतुक केले आहे.

असे असले तरी, दिवंगत माजी पंतप्रधानांचे नाव असलेल्या उद्यानाचे आता नामकरण करण्यात आले असून त्याचे पुन्हा उद्घाटन करण्यात येत आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाले तेव्हा जनतेने त्यांच्या नावाने हे उद्यान सुरु करण्यात आले होते. २००४ मध्ये बिहारमधील एका रॅलीत वाजपेयींनी आपण 'अटल' तसेच 'बिहारी' असल्याचे म्हटले होते, यावरून त्यांचे बिहारशी असलेले नाते दिसून येते. आणीबाणीच्या काळात ते पूर्व चंपारणला आले आणि त्यांना अटक झाली होती.
 
त्या उद्यानात कंकरबागच्या लोकांनी स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळाही बसवला होता. आता त्यांच उद्यानाचे नाव तेज प्रताप यादव बदलणार आहेत. याचा समाचार घेत बिहार भाजपचे प्रवक्ते अरविंद कुमार सिंह म्हणाले की, एकीकडे नितीश कुमार पूज्य अटलजींच्या समाधीवर पुष्पहार अर्पण करण्यासाठी जातात, तर दुसरीकडे जनतेने उद्यानाला अटलजींच्या दिलेल्या नावाला नकारतात. त्यामुळे भारतरत्न अटलजींच्या नावावर असलेल्या उद्यानाचे नाव बदलणे यापेक्षा वाईट काय असू शकते, असा सवाल त्यांनी केला.




या उद्यानाचे नाव दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावावरच राहू द्यावे आणि त्यात छेडछाड करू नये, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे केली आहे. बिहारच्या पर्यावरण विभागाने हा निर्णय घेतला आहे. अरविंद कुमार सिंह यांनी हा निर्णय फिरंग्यांच्या सांगण्यावरून घेतला असल्याचे म्हटले आहे. बिहार सरकारचा दावा आहे की पाटणाला ऑगस्टमध्ये १६ उद्यानांची भेट मिळेल, ज्याची सुरुवात ३ ऑगस्टपासून झाली आहे. त्यात एकट्या कंकरबागेतील ७ उद्यानांचे उद्घाटन होणार असल्याची चर्चा आहे.

तेज प्रताप यादव यांनी ८ ऑगस्ट २०२३ रोजी राजेंद्र नगरमध्ये २ उद्यानांचे उद्घाटन केले. या उद्यानांमध्ये मोफत प्रवेश तसेच चालण्याची सुविधा, महिला व पुरुषांसाठी खुली व्यायामशाळा, वॉटर कुलर, लोकांना बसण्यासाठी बाक, लहान मुलांसाठी झूले, वर्मी कंपोस्ट आणि स्वच्छतागृहे असतील, असे सांगण्यात येत आहे. तेज प्रताप यादव यांनी पर्यावरण रक्षणासाठी ११ कलमी ठरावही दिला असून, त्याअंतर्गत लोकांनी झाडे लावावीत आणि त्यांची काळजी घ्यावी, नद्या आणि तलावांचे पाणी दूषित होऊ नये आणि आसपासच्या परिसराव्यतिरिक्त फक्त आवश्यक पाणी वापरावे, असे सांगण्यात आले आहे.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.