'हिंदुस्थान पेट्रोलियम'मध्ये नोकरीची संधी; 'या' पदांकरिता भरती सुरु
21 Aug 2023 16:46:08
मुंबई : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील नामांकित तेल आणि गॅस कंपनीकंपन्यांपैकी एक असलेली हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध रिक्त पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. कंपनीकडून रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उत्तीर्ण उमेदवारास नोकरीचे ठिकाण मुंबई येथे असणार आहे.
दरम्यान, एचपीसीएलमध्ये भरती अंतर्गत यांत्रिक अभियंता, विद्युत अभियंता, उपकरण अभियंता, स्थापत्य अभियंता, रसायन अभियंता, वरिष्ठ अधिकारी, अग्निशमन आणि सुरक्षा अधिकारी, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, चार्टर्ड अकाउंटंट, कायदा अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, महाव्यवस्थापक, कल्याण अधिकारी, माहिती प्रणाली अधिकारी या पदांच्या एकुण २७६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
तसेच, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. १८ सप्टेंबर २०२३ असणार आहे. यापूर्वी उमेदवारास अर्ज भरणे बंधनकारक असणार आहे. तसेच, निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार असून भरतीसंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी एचपीसीएल अधिकृत वेबसाईट http://www.hindustanpetroleum.com ला भेट द्या.