मुंबईत उद्यापासून प्लास्टिक पिशव्या बंद होणार

20 Aug 2023 17:17:59
ban-on-plastic-bags-in-mumbai-from-tomorrow

मुंबई :
मुंबईत प्लास्टिक पिशव्या बंद करण्याचा निर्णय महानगर पालिकेकडून जाहीर करण्यात आला होता. या निर्णयानुसार उद्यापासून म्हणजेच दि. २१ ऑगस्टपासून प्लास्टिक पिशव्या बंद होणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा लागणार आहे. दरम्यान, बीएमसीकडून यासंदर्भात धडक कारवाई करण्यात येणार आहे.

प्लास्टिक पिशव्यांच्या बंदीच्या निर्णयानंतर आता पालिका अॅक्शन मोडमध्ये आली असून याकरिता एक भरारी पथक नेमण्यात येणार आहे. या पथकात एका पोलीस अधिकाऱ्यासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचा एक अधिकारी आणि पालिकेच्या तीन अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.

दरम्यान, भरारी पथकाकडून दुकानदार, फेरीवाले आणि मॉलमध्ये कारवाई केली जाणार असून कारवाईदरम्यान ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या आढळल्यास ५ हजारांचा दंड आकारण्यात येणार आहे.





Powered By Sangraha 9.0