डोंबिवलीत भाजपची पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळा

    20-Aug-2023
Total Views | 64
Dombivali BJP Organized Eco Friendly Ganesha Murthy

डोंबिवली :
भाजपच्या वतीने पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येक गणेश भक्तांच्या घरी इकोफ्रेंडली गणपती बाप्पा यावा यासाठी पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे गणेश मंदिर भाजपा ग्रामीण मंडल कार्यालय सुदामा नगर एमआयडीसी डोंबिवली पूर्व येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये सुमारे शंभर ते दीडशे मुला मुलींनी सहभाग नोंदवला होता . कल्याण ग्रामीण विधानसभा निवडणूक प्रमुख नंदू परब यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन रविवारी करण्यात आले. यावेळी ग्रामीण मंडळ संघटन सरचिटणीस सूर्यकांत माळकर, जिल्हाध्यक्ष वाहतूक दत्ता माळेकर व वॉर्ड ८५ अध्यक्ष संतोष शुक्ला, मूर्तिकार सचिन तूपगावकर व त्यांचे सहकारी तुलसीदास वाघ, समीर देशमुख तसेच अनेक कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

नंदू परब म्हणाले, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने प्रत्येक गणेश भक्तांनी पर्यावरण पूरक मूर्तीचा वापर करावा यासाठी कठोर नियमावली जारी केली आहे.‌ प्रत्येक नागरिकाने शाडूच्याच मूर्तीचा वापर करावा.‌शाडूची मूर्ती वजनदार असली तरी आपण पर्यावरण राखण्यासाठी शाडूच्याच मूर्तीचा वापर करावा. प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती वापरू नये. पीओपी मूर्ती विरघळण्यास बराच कालावधी लागतो त्यामुळे पर्यावरणाची हानी होते. ही बाब पर्यावरणाला घातक आहे त्यासाठी जनतेमध्ये जनजागृती व्हावी म्हणून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळा आयोजित केली . शाडूच्या मूर्ती चा वापर करून पर्यावरणाचे रक्षण करावे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे निर्बंध कठोर असले तरी नागरिकांनी त्यांना सहकार्य करून शाडूच्याच गणेश मूर्तीचा वापर करावा असे आवाहन ग्रामीण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121