'एनसीएल'मध्ये ग्रॅज्युएट/डिप्लोमा अप्रेंटिसच्या ७०० पदांसाठी भरती

02 Aug 2023 16:07:19
Northern Caolfields Limited (NCL) Recruitment For Apprentice

मुंबई
: नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (एनसीएल) मध्ये पदवीधर, डिप्लोमाधारकांना संधी उपलब्ध झाली आहे. त्यासंदर्भातील जाहिराती प्रसिध्द करण्यात आली आहे. याकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले असून विविध अप्रेंटिस पदासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तसेच, कोळसा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारत सरकारच्या एंटरप्राइझने एम्प्लॉयमेंट मध्ये ७०० अप्रेंटिस पदांसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

दरम्यान, या अप्रेंटिस पदांसाठी अर्ज करण्याची सुरुवात २० जुलैपासून सुरुवात झाली असून ०३ ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. दरम्यान, निवड प्रक्रियेअंतर्गत, अर्ज केलेल्या पदाच्या संदर्भात लागू असलेल्या पात्रता पदवी/डिप्लोमा अभ्यासक्रमांमध्ये उमेदवारांनी मिळवलेल्या एकूण गुणांच्या आधारे मूळ कागदपत्रांच्या छाननीसाठी पुरेशा आणि योग्य उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग केली जाईल.

एनसीएलमध्ये ग्रॅज्युएट/डिप्लोमा अप्रेंटिसच्या ७०० पदांच्या रिक्त जागेचा तपशील पुढीलप्रमाणे :

ग्रॅज्युएट/डिप्लोमा अप्रेंटिस-७०० पदे (एकूण)

बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन- २५

बॅचलर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग -१३

बॅचलर ऑफ फार्मसी-२०

बॅचलर ऑफ कॉमर्स-३०

बॅचलर ऑफ सायन्स-४४

बॅचलर ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग-७२

बॅचलर ऑफ मेकॅनिकल इंजिनीअरिंग-९१
 
खाण अभियांत्रिकी पदवी -८३

बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग-२

डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग -१३

डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग-९०

डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग-१०३

डिप्लोमा इन खाण अभियांत्रिकी-११४




Powered By Sangraha 9.0