बीएमसी कोविड घोटाळा प्रकरण; राऊतांनी कोट्यवधी पैसे मित्रपरिवाराच्या खात्यात वळविल्याचा सोमय्यांचा आरोप

19 Aug 2023 15:17:25
BJP leader Kirit Somaiya On MP Sanjay Raut

मुंबई :
मुंबईतील कोविड घोटाळा प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा आवाज उठवला असून यासंदर्भात ते म्हणाले, पालिकेतील खिचडी घोटाळा हा जवळपास १६० कोटी रुपयांचा असल्याचे सोमय्या म्हणाले, यावेळी सोमय्यांनी पुन्हा एकदा खा. संजय राऊत आणि ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, कोविड काळातील खिचडी घोटाळा संजय राऊत यांनी यांसदर्भातली कंत्राटे मिळवून आपल्या मित्रपरिवाराचा फायदा करून दिल्याचे सोमय्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोविड काळातील घोटाळ्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात पुरावेदेखील सादर केले होते. त्यामुळे सोमय्यांनी पुन्हा एकदा कोविड घोटाळ्यातील मुख्य आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी मागणी केली आहे. तसेच, संजय राऊतांनी आपले पार्टनर सुजीत पाटकर, राजीव साळुंखे आणि मित्रांच्या खात्यात खिचडी घोटाळ्याचे कोट्यवधी पैसे वळते केल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

सुजीत पाटकर हे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचे निकटवर्तीय आहेत. पाटकर हे पेशाने व्यावसायिक आहेत. लाइफसायन्सेस हॉस्पिटल अँड मॅनेजमेंट या फर्ममध्ये पाटकर एक भागीदार होते. सुजीत पाटकर हे संजय राऊत यांचे फ्रंटमॅन असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला होता.






Powered By Sangraha 9.0