महाराष्ट्र राज्य पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागात नोकरीची संधी

    16-Aug-2023
Total Views |
Maharashtra State Tourism Department And Cultural Department Recruitment

मुंबई :
महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग आणि सांस्कृतिक विभाग या दोन्हींतील रिक्त जागा लवकरच भरल्या जाणार आहेत. शासनाकडून यासंदर्भात जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक व पात्र उमेदवारांनी या नोकरभरतीसाठी अर्ज करावयाचा आहे. यासंदर्भात शासनाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दरम्यान, सरळ सेवा भरतीतून ही रिक्त पदे भरली जाणार आहेत. याकरिता अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या, सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयातील खालील गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील ३९ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया दि. १५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२३ या कालावधीत सुरू राहणार आहे. उमेदवारांनी <https://ibpsonline.ibps.in/dambodian 23/> या संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत.

पुढील रिक्त पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत

सहाय्यक अधिक्षक (गट-क),कनिष्ठ अभियंता (गट-क), जतन सहायक (गट-क), तंत्र सहायक (गट-क), मार्गदर्शक व्याख्याता (गट- क), उप आवेक्षक (गट-क), छायाचित्रचालक (गट-क), अभिलेखाधिकारी गट-ब (अराजपत्रित), फार्शीज्ञात संकलक (गट- क), रसायनशास्त्रज्ञ (गट-क), संशोधन सहाय्यक (गट- क), संकलक (गट-क), सहाय्यक छायाचित्रकार (गट-क), ग्रंथपाल लिपिक- नि-भांडारपाल (गट-क), अभिलेख परिचर (गट-क), तंत्रज्ञ मदतनीस (गट-क), अधिक्षक (गट-ब अराजपत्रित), सहायक (गट-क) (कार्यालय- सां. कार्य), सहायक संशोधन -अधिकारी (गट-ब अराजपत्रित), सहायक (गट-क) (कार्यालय- दर्शनिका), टिप्पणी सहायक (गट-क).