मुंबई : नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या पतधोरण आढाव्यात रेपो दर ६.५ टक्क्यांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय बँकिंग सेक्टरवर झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, किरकोळ चलनवाढीमुळे रिझर्व्ह बँकेने रेपो दर स्थिर ठेवला. त्यामुळे बँकेकडून व्याज दर कमी केले जाण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच, बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, व्याजदर दीर्घकाळ या पातळीवर राहतील आणि त्यांची कपात पुढील आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धातच सुरू होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीत किरकोळ चलनवाढीचा दर ५.२ टक्क्यांवर येण्याचा अंदाजही वर्तवला आहे. तसेच, देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने व्याजदर स्थिर ठेवले, मात्र त्यानंतरही अनेक बँकांनी व्याजदर वाढवले आहेत. दि. ११ ऑगस्ट रोजी अनेक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्यांच्या कर्जदरात वाढ केली. बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र यांनी एमसीएलआरच्या दरात ०.१० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.