मुंबई महानगर प्रदेशाच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार: एमएमआरडीए

    14-Aug-2023
Total Views | 55
MMRDA

केवळ मुंबई शहराचा आणि उपनगराचा विकास, असा दृष्टिकोन न ठेवता संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ अर्थात ‘एमएमआरडीए’ प्रयत्नशील आहे. नागरिकांच्या सुखकर भविष्यासाठी प्राधिकरणामार्फत मुंबई महानगर प्रदेशात सुमारे अडीच लाख कोटींचे प्रकल्प सध्या प्रगतिपथावर आहेत. तेव्हा महाराष्ट्राच्या विकासपर्वात सिंहाचा वाटा उचलणार्‍या ‘एमएमआरडीए’च्या विविध प्रकल्पांचा घेतलेला हा आढावा...

मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, पायाभूत सुविधांचा विकास आणि उभारणीला चालना मिळावी, या हेतूने १९७५ मध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) स्थापना झाली. मुंबई तसेच मुंबई लगतच्या क्षेत्रांतील स्थानिक स्वराज्य संस्थांशी समन्वय साधून पायाभूत सुविधांचा सुनियोजित विकास करून, या भागातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे आणि प्रदेशाला आर्थिक चालना देणे, हा प्राधिकरणाच्या स्थापनेमागील उद्देश आता साध्य होताना दिसत आहे. मुंबई महानगर प्रदेशासाठी प्रादेशिक नियोजन आराखडा तयार करणे, त्यानुसार महानगर प्रदेशाच्या विकासाबाबतची दूरदृष्टी ठेवून प्रकल्प राबविणे आणि या प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशाचा सर्वांगीण विकास साधणे, यासाठी ’एमएमआरडीए’ नेहमीच कार्यरत असते. प्रकल्पांच्या उभारणीसह प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन करण्यातदेखील प्राधिकरण कायमच अग्रेसर राहिले आहे.

शाश्वत आणि पर्यावरपूरक पायभूत सुविधांच्या विकासासाठी ’एमएमआरडीए’ नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करत आहे. ’एमएमआरडीए’ केवळ प्रकल्पांची उभारणी करत नसून, भावी पिढ्यांच्या भविष्याचा पाया रचत आहे.मुंबई महानगर प्रदेशात पायाभूत सुविधा सुधारण्याच्या अनुषंगाने ’एमएमआरडीए’च्या माध्यमातून मेट्रो रेल्वे प्रकल्प, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प, ऐरोली कटाई नाका रस्ता प्रकल्प, मोठागाव-मानकोली खाडी पूल, सुर्या प्रादेशिक पाणपुरवठा प्रकल्प यांसारखे विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविले जात आहेत. याचसोबत, आगामी काळात ठाणे-बोरिवली भूमिगत मार्ग, पूर्व मुक्त मार्गावरील ऑरेंज गेट ते नरिमन पॉईंटदरम्यान भूमिगत मार्ग यांसारखे अभियांत्रिकी क्षेत्रात अद्वितीय प्रकल्प राबविले जाणार आहेत. मुंबई उपनगरे आणि लगतच्या प्रदेशातून मुंबईच्या दिशेने प्रवास करण्यासाठी दळवळणाची साधने तसेच पायाभूत सुविधा सुधारण्याच्यादृष्टीने हे प्रकल्प महत्त्वपूर्ण आहेत.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक

हा भारतातील सर्वात लांब सागरी सेतू असून, तोे महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचा द्योतक ठरेल. मुंबई बेट मुख्यभूमी सोबत जोडून मुंबई महानगर प्रदेशाच्या तसेच महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणारा ‘मुंबई ट्रान्स हार्बर लिंक’ (‘एमटीएचएल’)प्रकल्प हा पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. मुंबईतील शिवडी येथून सुरू होऊन नवी मुंबईतील चिर्ले येथे संपणारा सुमारे २२ किमी लांबीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे या दोन भागांतील अंतर कमी वेळात पार होणार असल्याने, मुंबई महानगर प्रदेशात व्यवसायवाढीसाठी चालना मिळणार असून, रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. ज्यामुळे महाराष्ट्राच्या तसेच भारताच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.

या प्रकल्पामुळे मुंबई आणि लगतच्या परिसरात सकारात्मक बदल घडून येतील. सध्या, मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानच्या प्रवासाला सुमारे दोन तासांहून अधिक वेळ लागतो, ज्यामुळे इंधन आणि वेळेचे नुकसान होते. ‘एमटीएचएल’ प्रकल्प पूर्ण झाल्यावर, प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होईल, ज्यामुळे नवी मुंबई आणि आसपासच्या औद्योगिक आणि नागरी विकासाला प्रोत्साहन मिळेल. ’एमटीएचएल’ प्रकल्प मुंबई सोबत राज्यातील प्रमुख शहरांना जलदगतीने जोडणार असल्यामुळे मुंबई महानगर प्रदेशात सकारात्मक बदल घडून येतील. तसेच, आर्थिक वाढीसाठी तो उत्प्रेरक ठरेल.‘ऑर्थोट्रोपिक स्टील डेक’ या अत्याधुनिक जपानी तंत्रज्ञानाचा वापर करून सुमारे २२ किमी लांबीचा आणि ‘३ + ३’ मार्गिकांचा हा सागरी सेतू आहे. ‘एमटीएचएल प्रकल्पा’त विविध प्रगत वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञान वापरले असून, तो पुढील १०० वर्षे टकून राहण्यासाठी तयार केले आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी दहांहून अधिक देशांतील तज्ज्ञ आणि कुशल तीन शिफ्टमध्ये २४ तास काम करत आहेत. सुमारे १०० किमी/तास वेगाने या पुलावरून प्रवास करता येईल.

मुंबई मेट्रो रेल प्रकल्प

सद्यःस्थितीत कार्यान्वित असलेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील ताण लक्षात घेता, नवीन पर्यावरणपूरक आणि शाश्वत वाहतूक व्यवस्था उभारणे, ही काळाची गरज आहे. हे ओळखून ‘एमएमआरडीए’ने मेट्रो रेल ही नवी वाहतूक सुविधा उभारण्याचे ठरविले. मुंबईसारख्या लोकसंख्येने घनदाट असलेल्या शहरात प्रकल्प राबविण्याचे आव्हान ’एमएमआरडीए’ने स्वीकारत सुमारे ३३७ किमी लांबीचे मेट्रोचे जाळ उभारण्याचेे काम हाती घेतले आहे. मेट्रो ही पूर्णपणे विद्युत प्रणाली असून, नागरिकांना आरामदायी आणि जागतिक दर्जाची वाहतूक व्यवस्था प्रदान करण्याचे प्राधिकरणाचे उद्दिष्ट आहे. मेट्रोमुळे खासगी रस्ते वाहतूक कमी होऊन पर्यावरणातील प्रदूषणाचे प्रमाण तसेच शहरी वाहतूककोंडी कमी होईल.

मेट्रो प्रकल्प उभारताना जागेची समस्या निर्माण होत असल्याने ’एमएमआरडीए’ने त्याचे संरेखण हे रस्त्यांच्या मधोमध ठेवले आहे. जेणेकरून नागरी वस्तीवर त्याचा कमीत कमी परिणाम होईल. त्यासोबतच मुंबईसारख्या २४ तास धावत्या शहरात मेट्रोच्या उभारणीचे काम करणे, आव्हानात्मक असल्याने ती कामे जास्तीत जास्त रात्रीच्या वेळी पार पाडली जातात. मुंबईसारख्या दाट लोकसंख्येच्या आणि गुंतागुंतीच्या शहरात विविध आव्हानांवर आणि समस्यांवर मात करून मेट्रो रेल प्रकल्प यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ’एमएमआरडीए’ समर्पित आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतेच मुंबई मेट्रोचे उद्घाटन करून मुंबईला पाहिले मेट्रो नेटवर्क सुपुर्द केले. ज्याचा फायदा रोज लाखो मुंबईकर प्रवाशांना होत आहे. सध्या प्राधिकरणामार्फत सात मेट्रो मर्गिकांची कामे प्रगतिपथावर असून, ती पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.
 
रस्ते प्रकल्प

मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई जिल्ह्यांना जलदगतीने जोडणारे प्रकल्प राबवित आहेत. ज्यापैकी सुमारे १२.३ किमी लांबीचा ऐरोली-कटाई नाका रस्ता प्रकल्प ठाणे-बेलापूर ते राष्ट्रीय महामार्ग क्रचार दरम्यान प्रगतिपथावर आहे. या प्रकल्पात पारसिक टेकड्यांमधील बोगद्याचा समावेश आहे. तसेच मोठागाव-मानकोली दरम्यान उल्हास खाडीवरील सहापदरी पुलाचे कामही प्रगतिपथावर आहे. या प्रकल्पांमुळे ठाणे आणि कल्याण-डोंबिवली दरम्यानचे अंतर कमी होणार असून, प्रवासाच्या वेळेची तसेच इंधनाची लक्षणीयरित्या बचत होणार आहे.

त्यासोबतच येत्या काही दिवसांत प्राधिकरणामार्फत ठाणे-बोरिवली दरम्यान ११.८ किमी लांबीच्या भूमिगत मार्गाचे तसेच मुंबई शहरातील पूर्व मुक्त मार्गावरील ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दरम्यान ६.५ किमी लांबीच्या भूमिगत मार्गाचे बांधकाम हाती घेण्यात येणार आहे. पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी दरम्यान रस्त्याने जलद जोडणी नसल्यामुळे दक्षिण मुंबईच्या शहरी भागाला शहरातील वाहतूककोंडीसह महत्त्वपूर्ण आव्हानांचा सामना करावा लागत आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी तसेच रस्ते मार्गाने मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी दरम्यान वाहतूक सुविधा पुरवण्यासाठी ’एमएमआरडीए’ ६.५ किमी लांबीचा भूमिगत बोगदा आणि रस्ता बांधण्याचे काम हाती घेत आहे. हा प्रकल्प मुंबई शहरातील पूर्व मुक्त मार्गावरील ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह येथील मुंबई किनारा प्रकल्पाला जोडणार आहे. त्यामुळे मुंबई शहर परिसरात पूर्व-पश्चिम किनारपट्टीला जोडणारा आणि जलद तसेच सुव्यवस्थित वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरेल. ज्याच्यामुळे पूर्वमुक्त मार्ग आणि मरीन ड्राईव्ह दरम्यान प्रवास जलदगतीने होणार आहे. तसेच ठाणे बोरिवलीदरम्यान बांधण्यात येणार्‍या ११.८ किमी लांबीच्या या भूमिगत बोगद्यामुळे या दोन भागातील वाहतुकीच्या वेळेत सुमारे एक तासांची बचत होणार आहे.

‘सुर्या प्रदेशिक पाणीपुरवठा योजना’

मुंबई महानगर प्रदेशाच्या पश्चिम क्षेत्रातील वसई-विरार, मिरा-भाईंदर हा उपप्रदेश भारतातील सर्वात वेगाने वाढणार्‍या शहरी समूहांपैकी एक असून, जवळपास ५० टक्क्यांहून अधिक विकास दराने वाढत आहे. विकासासोबतच या भागातील पिण्याच्या पाण्याची समस्यादेखील गंभीर होत असल्याने, ‘एमएमआरडीए’ने सुमारे ४०३ दशलक्ष प्रतिदिन क्षमतेची ‘सुर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना’ उभारत आहे. या दोन पालिका क्षेत्रांची तहान ‘सुर्या प्रदेशिक पाणीपुरवठा योजने’मुळे भागणार असल्याने आता जवळपास २० लाख नागरिकांचा स्वच्छ पिण्यायोग्य पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे वाहतूक सुविधा सुधारणे, नवीन वाहतूक व्यवस्था निर्माण करणारे तसेच पाणीपुरवठा संदर्भातले हे प्रकल्प, मुंबई महानगर प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या सर्वसमावेशक दृष्टिकोन दर्शवितात.



(सौजन्य ः एमएमआरडीए)


अग्रलेख
जरुर वाचा
चित्रपटात काम करणे म्हणजे त्याआधी.. संत मुक्ताईच्या भूमिकेसाठी नेहा नाईकने घेतले वाणी प्रशिक्षण!

"चित्रपटात काम करणे म्हणजे त्याआधी.." संत मुक्ताईच्या भूमिकेसाठी नेहा नाईकने घेतले वाणी प्रशिक्षण!

भूमिकांच्या जवळ जाताना या कलाकारांना खूप मेहनत घ्यावी लागते. त्यातही ती भूमिका आव्हानात्मक असेल तर जबाबदारी अधिक वाढते. दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटातून अभिनेत्री नेहा नाईक हा युवा चेहरा भेटीला येणार आहे. या चित्रपटातील संत मुक्ताईची भूमिका ती साकारणार आहे. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य मराठी चित्रपट १८ एप्रिलला आपल्या भेटीला येतोय. रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत ..