पुण्यातून एका संशयीत दहशतवाद्याला अटक!

12 Aug 2023 14:11:04
 
Shamil Saqib Nachan
 
 
पुणे : शहरात दहशतवादी कारवाया करण्याच्या कटात सहभागी असल्याप्रकरणी एनआयएने आणखी एका आरोपीला शुक्रवारी अटक केली आहे. शमील साकिब नाचन असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण आणि स्फोट घडवून आणण्यासाठी घेतलेल्या चाचणीत सहभागी असल्याचे आढळून आले आहे.
 
शमिल याच्यासह अटक करण्यात आलेले दहशतवादी इसिसच्या स्लीपर मॉड्यूलचे सदस्य आहेत. पुण्यातील कोंढवा येथील घरातून त्यांची दहशतवादी कृत्ये सुरू होती. त्यांनी बॉम्ब तयार करण्यासाठी स्फोटके आणि इतर साहित्य एकत्र केले होते. तसेच बॉम्ब तयार करण्याच्या प्रशिक्षणातही त्यांनी सहभाग घेतला होता. इतकेच नव्हे तर त्यांनी तयार केलेल्या बॉम्बची चाचणी घेण्यासाठी नियंत्रित स्फोटही घडवून आणला होता.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0