इंजेक्शन देताना सुई शरीरात घुसली, दोनवेळा शस्त्रक्रिया करुन काढली बाहेर

12 Aug 2023 14:54:22

Injection


चंद्रपूर :
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे एक अजब प्रकार घडला आहे. रुग्णाला इंजेक्शन देत असताना सुई चक्क त्याच्या शरीरात गेल्याची ही घटना आहे. या घटनेने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. संदीप आत्राम नावाचे गृहस्थ १ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी तेथील एका कंपांउंडरला आत्राम यांना इंजेक्शन द्यायला सांगितले.
 
इंजेक्शन देत असताना औषधाच्या दबावामुळे सुई सिरींजमधून बाहेर पडून सरळ संदीप यांच्या शरीरात घुसली. ही माहिती डॉक्टरांना कळताच त्यानी लगेच शस्त्रक्रिया केली. मात्र, त्यादिवशी सुई सापडली नाही. नंतर दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी सीटीस्कॅनद्वारे सुई शोधून परत शस्त्रक्रिया केली व सुई शरीरातून बाहेर काढली.

Powered By Sangraha 9.0