मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागविण्यात आले असून विविध पदांकरिता ही संधी उमेदवारास मिळणार आहे. महावितरणमध्ये रिक्त ३६ जागांकरिता भरतीप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ही भरतीप्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारास भंडारा येथे नोकरीस जावे लागणार आहे. दरम्यान, महावितरणमध्ये १० वी/ आयटीआय उत्तीर्ण उमेदवारास याकरिता अर्ज करता येणार आहे.
दरम्यान, इलेक्ट्रिशयन, वायरमन आणि सीओपीए या पदांसाठी भरती सुरु असून यासाठी १८ ते ३० वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २० ऑगस्ट असणार आहे. दरम्यान, राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री,तारतंत्री व कोपा व्यवसाय प्रशिक्षण उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.