साष्टी-वसई मोहीम : मराठी अभिमानाचे सुवर्णपान

10 Aug 2023 13:30:18

raviraj 
 
मुंबई : भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांत (बोरीवली भाग ) आणि बोरीवली सांस्कृतिक केंद्र आयोजित 'इतिहास कट्टा:गप्पा इतिहासाच्या' दहाव्या भागात 'साष्टी-वसई मोहीम :मराठी अभिमानाचे सुवर्णपान' हा विषयचर्चीला जाणार आहे. यासाठी वक्ते म्हणून भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रणमत चे उपाध्यक्ष तसेच इतिहास अभ्यासक रविराज पराडकर उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रम दि .१३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता बोरीवली सांस्कृतिक केंद्राचे ज्ञानविहार ग्रंथालय प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह संकुल, सी विंग, तिसरा मजला येथे संपन्न होणार आहे.
 
मराठ्यांच्या इतिहासातील एक अभिमानी विजय म्हणजे साष्टी-वसई मोहीम. मराठी साहस, दुर्दम्य पराक्रम आणि स्वधर्मरक्षणाचे दर्शन घडवणाऱ्या ह्या युद्धपर्वाचे मर्म जाणून घेण्यासाठी तसेच नरवीर चिमाजी आप्पासह असंख्य वीरांच्या शौर्याची गोष्ट ऐकण्यासाठी इतिहास कट्टयावर अवश्य उपस्थिती लावा असे आवाहन सदस्य सुरेंद्र त्यांना यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0