मुंबई : हिंदू संस्कृतीची पाळे मुळे जगभर विस्तारलेली दिसतात. त्यांची रूपे आणि उपासना पद्धती मात्र प्रदेशानुरूप भिन्न आहेत. हा फोटोमध्ये दिसतो आहे तो आहे, इंडोनेशियन हनुमान! इतिहास अभ्यासक आणि पुरातत्वज्ञ गिरीजा दुधाट यांनी हा फोटो शेअर केला आहे. सदर छायाचित्र केम्ब्रिज येथील म्युझियम ऑफ आर्किओलॉजि अँड ओंथ्रोपोलॉजि येथील आहे.
बालीमध्ये हनुमानाला ग्रामरक्षक मानलं जातं. विसाव्या शतकापर्यंत इंडोनेशियाच्या बहुसंख्य गावांमध्ये हनुमंताची मूर्ती गावाच्या वेशीजवळ स्थापन केलेली असायची. या रक्षकाला म्हणजेच हनुमाला येथे 'पेकेलाँग' म्हणतात. उल्लेखनीय बाब म्हणजे बालीमध्ये पोलिसांना आजही 'पेकेलाँग' म्हणतात!