मुंबई : “ये हाथ मुझे दे दे ठाकूर”, हे संवाद आजही प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. १९७५ साली दिग्दर्शक राजेश सिप्पी यांनी एक माईल्ड स्टोन चित्रपट 'शोले' प्रेक्षकांना दिला होता. आज ४८ वर्षांनंतर देखील शोल चित्रपटातील प्रत्येक संवाद, व्यक्तिरेखा, सीन आपल्याला लक्षात आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का की चित्रपटातील एक महत्वाचा सीन हा हॉलिवूडमधील एका चित्रपटाच्या सीनसोबत अतिशय तंतोतंत जुळतो.
'शोले' चित्रपटातील एक महत्वाचा सीन म्हणजे ज्यावेळी ठाकूर अर्थात अभिनेते संजीव कुमार आपल्या गावी परत येत असतात त्या आधी गब्बर म्हणजेच अमजद खान संजीव कुमार यांच्या संपुर्ण कुटुंबाची हत्या करतो. आणि मग पुढे ठाकूर आणि गब्बर यांच्यात कशी जुंपते हे तर जगजाहिर आहेच. मात्र, ट्विटरवर एका युजरने हॉलिवूड चित्रपटातील या सीनचा व्हिडिओ शेअर केला आहे, जो शोले मधील त्या सीनसोबच जुळणारा आहे. या व्हिडिओ खाली अनेकांनी कमेंट करत हा इंग्रजी शोले असल्याचे म्हटले आहे.