ब्लँकरॉक जिओ ऐतिहासिक पार्टनरशिपचा नवा अध्याय

01 Aug 2023 12:24:38

Blackrock
 
 
 
ब्लँकरॉक जिओ ऐतिहासिक पार्टनरशिपचा नवा अध्याय
 
 
नवी दिल्ली:  जगातील विशाल असेट मॅनेजमेंट कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्लँकरॉक कंपनीने मुकेश अंबानी यांच्या जियो फायनाशिअल सर्विसेस या समुहाशी हातमिळवणी केली आहे.ब्लँकरॉक ने जियो फायनाशिअल शी हातमिळवणी केल्याने नवीन वेचंरचे जियो ब्लँकरॉक कंपनी असे नामकरण करण्यात आले आहे.दोन्ही कंपन्यांनी हातमिळवणी केल्याने मुबलक भांडवल व व्यवस्थापन या जोरावर बाजारात ही कंपनी अग्रेसर राहिल असे सांगण्यात आले आहे.
 
 
नुकतेच रिलायन्स इंडस्ट्रीज मधून स्वतंत्र होत जिओ फायनाशिअल सर्विसेस ही स्वतंत्रपणे कंपनी उभी करण्यात आली होती. जगभरात ब्लँकरॉक ही वेगवेगळ्या असेट आणि इक्विटी गूंतवणूक केलेली धनाढ्य कंपनी आहे.ती यापूर्वी भारतात सक्रिय होती पण २०१८ साली त्यांनी काढता पाय घेतला होता.परंतु भारतातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांच्या जिओ बरोबर हातमिळवणी करत पुन्हा पदार्पण करत आहे.
 
 
रॉयटर्सचा वृत्तानुसार ब्लँकरॉकची जून २३ अखेरीस ९.४ ट्रिलियन डॉलरची असेट अंडर मॅनेजमेंट स्थावर मालमत्ता आहे . जिओ फायनाशिअल सर्विसेसची पार्टनरशिप केल्यावर भारतात दोन्ही कंपन्या ५०-५० ची भागीदारी करतील .दोन्ही कंपन्या मिळून सुमारे १५० मिलियन डॉलरची गुंतवणूक करणार आहेत असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.
 
 
ब्लँकरॉक कंपनी ही रिस्क मॅनेजमेंट,प्रोडक्ट,पोर्टफोलिओ इत्यादी आर्थिक सेवा आणि इन्स्ट्रुमेंटससाठी प्रसिद्ध आहे.ॲपल कंपनीत यांचे ६.५ टक्यांपर्यंत शेअर्स आहेत.
Powered By Sangraha 9.0