अमेरिकन गायिका 'कोको ली'चे ४८ व्या वर्षी निधन

    06-Jul-2023
Total Views |

coco le

हॉंगकॉंग :
नैराश्यातून अनेकवेळा आत्महत्येचा प्रयत्न करणारी प्रसिद्ध गायिका कोको ली हिचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे. कोकी ली हिने काही दिवसांपूर्वी नैराश्यातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर ती कोमात गेली होती. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते, अखेर कोको ली हिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. तिची बहिण कॅरोल आणि नॅन्सी ली हिने समाजमाध्यमावर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली.
कोको ली यांची बहिण कॅरोल आणि नॅन्सी हिने दिलेल्या माहितीनुसार, कोको ली गेल्या काही वर्षांपासून नैराश्याने त्रस्त होत्या. कोको ली ने नैराश्याशी लढण्यासाठी अनेक डॉक्टर आणि प्रोफशनल व्यक्तींची मदत घेतली होती. तिने यातून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न केला होता. रविवारी (२ जुलै) तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्या कोमात गेल्या.तिने आत्महत्या केल्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने कोको लीला वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न केले. पण ५ जुलै रोजी तिने अखेरचा श्वास घेतला.
कोको ली बद्दल...
कोको लीचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला. सध्या ती तिथेच राहत होती. कोको ली ३० वर्षांपासून संगीत इंडस्ट्रीत कार्यरत होती. गाण्याचे अनेक लाईव्ह कार्यक्रम तिने केले होते. अ लव्ह बिफोर टाइम हे ऑस्कर नामांकित गाणेही तिने सादर केले होते. १९७५ मध्ये हाँगकाँगमध्ये जन्मलेली कोको ली कुटुंबातील सर्वात लहान होती. तिच्या जन्मापूर्वीच वडिलांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर तिची आई तिला आणि इतर दोन मुलींना घेऊन प्रथम अमेरिका आणि नंतर सॅन फ्रान्सिस्कोला गेली. १९९२ मध्ये पदवीचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर, कोको लीला हाँगकाँगमधील कॅपिटल आर्टिस्ट्ससोबत रेकॉर्डिंग कराराची ऑफर देण्यात आली होती.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.