मुंबई : राजीनामा मागे घ्यायचा होता तर का दिला? असा थेट सवाल अजित पवारांनी शरद पवारांना केला आहे. शरद पवारांचा राजीनामा देण हे नाटक होत. असा दावा त्यांनी केला आहे. अजित पवार आज आपल्या समर्थकांसोबत शक्तिप्रदर्शन करत आहेत. याचं सभेत बोलतांना त्यांनी शरद पवारांवर टिका केली.
आज शरद पवारांच वय ८३ वर्ष झालयं. त्यांनी आता थांबायला पाहिजे. असा सल्लाही त्यांनी शरद पवारांना दिला. सोबतच त्यांनी सुप्रिया सुळेंना अध्यक्ष बनवण्याच्या सुचना आधीच शरद पवारांनी समितीला दिल्या होत्या. असा दावाही त्यांनी केला. सोबतच त्यांनी शरद पवारांना हट्टीपणा सोडून शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. नाहीतर आपल्याला बोलावे लागेल. असा इशारा अजित पवारांनी शरद पवारांना दिला आहे.
अजित पवार यांच्या सभेत ३२ आमदार सहभागी झाले आहेत. तर शरद पवार यांच्या सभेत अवघे १६ आमदार आले आहेत. त्यामुळे आज पक्ष कोणाच्या बाजूने आहे. हे चित्र स्पष्ट झाले आहे. हा शरद पवारांच्या राजकारणाला मोठा धक्का मानला जात आहे.