मुंबई (प्रतिनिधी): कार्ला येथे असलेल्या एकवीरा देवी मंदिर परिसरात सोमवार दि. १० जूलै रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसरात वड, पिंपळ, औदुंबर, चिंच, आंबा, बेल, पळस, कडुलिंब, बहावा इत्यादी देशी आणि स्थानिक झाडांची ५०० रोपे लावण्यात येणार आहेत.
कार्ल्यातील आई एकवीरा प्रतिष्ठान तर्फे हा उपक्रम राबविण्यात येत असुन या उपक्रमासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातील सामाजिक संघटना, उद्योजक, समाज सेवक, लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांना रोपे पाठविण्याचे आवाहन केले आहे. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर निलगिरीची झाडे आहेत, जी एक्झॉटिक म्हणजे विदेशी प्रजातीची झाडे आहेत.
ही झाडे लावण्यावर कायद्याने बंदी असुन तसेच तिथे स्थानिक प्रजातीच्या झाडांची गरज आहे. म्हणुनच स्थानिक देशी वनस्पती किंवा झाडांच्या रोपट्यांची लागवड येथे करण्यात येणार आहे.