मोठी बातमी! भुजबळ अचानक शिंदेंच्या भेटीला! काय घडलं?

04 Jul 2023 14:49:11
Chhagan Bhujbal meet Eknath Shinde

मुंबई
: विरोधी पक्षनेते असणाऱ्या अजित पवारांनी दि. २ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा देत, उपमुख्यमंत्री पदाची शपथ राजभवनात घेतली. त्यावेळी अजित पवारांसह ८ आमदारांनी ही मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी छगन भुजबळ यांनी ही मंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर दि. ३ जुलै रोजी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दरम्यान भुजबळ यांनी मुख्यमंत्री शिंदेंसोबत अर्धा तास चर्चा केली. या भेटीत खातेवाटपाबाबत आणि मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्यांच आता विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.

04 July, 2023 | 14:56
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. ४ जुलै रोजी मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार आणि त्यांचे सहकारी पहिल्यांदाच बैठकीला उपस्थित होते.

04 July, 2023 | 14:56

यावेळी आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. तर मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाड - सारथी शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली.

Powered By Sangraha 9.0