मुंबई (प्रतिनिधी): मुंबईच्या जुहू किनाऱ्यावर दि. ३० जूलै रोजी दुपारी एक लॉगरहेड टर्टल आले होते. या कासवाला प्रथम चौपाटीवरील लाइफ गार्ड्सने रेस्क्यु केले होते. त्यानंतर कांदळवन कक्षाच्या सदस्य तसेच वन विभागाने तत्काळ घटनास्थळी जाऊन या कासवाची पाहणी केली.
त्याची वैद्यकीय तपासणी केली असुन कोणतीही गंभीर जखम नसल्याची खात्री केल्यानंतर या कासवाला आता कांदळवन कक्षाच्या टर्टल ट्रान्झीटमध्ये ठेवण्यात आले आहे. पाण्यात पोहुन थकवा आल्याने हे कासव किनाऱ्यावर आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील निरिक्षणानंतर त्याला पुन्हा समुद्रात सोडुन देण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षीही लॉगरहेड कासवाच्या प्रजातीचे एक कासव मुंबईच्या किनाऱ्यावर आल्याची नोंद आहे. गेल्या वर्षी आलेले कासव हे वयाने व आकाराने मोठे होते. यंदाचं कासव हे तुलनेने लहान आकाराचे आहे.