अगदी दुखवटा पाळण्यासाठी आयोजित कार्यक्रमातही मुस्लीम समाज वाद्यांचा गजर करीत असतो. डीजेचे आयोजन केले जाते, मोठमोठ्या आवाजात गाणी लावली जातात. मग हिंदूं मिच्यारवणुकांच्यावेळी जी वाद्ये वाजविली जातात, त्यास मुस्लीम समाजाचा आक्षेप का?
रामनवमी, कावड यात्रा, गणेशविसर्जन मिरवणुका अशा अनेक सणांच्या दरम्यान हिंदू समाज विविध वाद्यांच्या आणि ढोल-ताशांच्या निनादात मोठमोठ्या मिरवणुका काढत असतो. पण, अशा मिरवणुका विशिष्ट भागातून जात असल्या की, त्यांच्यावर वाद्ये वाजविण्यास बंदी घातली जाते. पण, मुस्लीम सणांच्या वेळीही अशीच वाद्ये वाजविली जातात; पण त्यास मुसलमानांकडून आक्षेप घेतला जात नाही. विविध वाद्यांच्या गजरात निघालेल्या हिंदूंच्या मिरवणुका मुस्लीम प्रार्थनास्थळावरून जात असताना आक्षेप घेतला जातो. त्यावरून पूर्वी हिंदू आणि मुस्लीम यांच्यात देशाच्या विविध भागांमध्ये दंगलीही झाल्या आहेत. पण, मुस्लीम समाजाकडून दुखवटा पाळण्यासाठी योजण्यात आलेल्या मोहरमच्या वेळीही वाद्ये वाजविण्यात येत असल्याचे दिसून येते. मोठमोठ्या आवाजात अशा मिरवणुकांमध्ये डीजे लावले जातात. मुस्लीम समाजास हा वाद्यांचा आवाज कसा काय चालतो? की केवळ अन्यधर्मीयांच्या वाद्यांचाच या समाजास त्रास होतो?
गेल्या वर्षी ताझिया आणि डीजे यांच्यासह निघालेल्या मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी उत्तर प्रदेशातील बरेली आणि वाराणसी येथे हिंसाचार उसळला होता. यंदाच्या वर्षी विविध राज्य सरकारांनी डीजेचा वापर आणि मोठ्याने संगीत वाजविण्यावर काही निर्बंध आणले होते. मुस्लीम समाजाच्या मिरवणुकांमध्ये आजकाल ‘टोपी को जो ललकारेगा, उसे काट के रख देंगे, फेक देंगे काट के, आधा इधर, आधा उधर’ अशी गाणी वाजविली जातात. तलवारी नाचविल्या जातात.
शिया आणि सुन्नी मुस्लीम मोहरम वेगवेगळ्या प्रकारे पाळतात. मोहरमदरम्यान शिया आणि सुन्नी यांच्यात पूर्वीच्या काळात दंगलीही व्हायच्या. पण, आता ते प्रमाण खूपच कमी आहे. मोहरम पाळण्याची सुन्नी आणि शिया यांची पद्धत वेगवेगळी आहे. सुन्नी समाजाकडून मोहरमनिमित्त काढण्यात येणार्या मिरवणुका वादग्रस्त ठरल्या आहेत. डीजे वाजविण्यापासून ते दगडफेक करण्यापर्यंतचे प्रकार यादरम्यान घडले आहेत. तलवारी परजून ‘सर तन से जुदा’ अशा घोषणा अशा मिरवणुकांच्यामधून खुलेआम देण्यात येऊ लागल्या आहेत. सुन्नी समाजाने मोहरमच्या मिरवणुकांसाठी नवी प्रथा आणली आहे. या मिरवणुकीमध्ये ‘चारयारी’ गाणी म्हणण्यास त्यानी प्रारंभ केला आहे. अबू बकर, ओमर, उस्मान आणि अली या चार खलिफांच्या सन्मानार्थ या गाण्यांची सुरुवात सुन्नी समाजाने केली.
ही सर्व माहिती देण्याचे कारण अगदी दुखवटा पाळण्यासाठी आयोजित कार्यक्रमातही मुस्लीम समाज वाद्यांचा गजर करीत असतो. डीजेचे आयोजन केले जाते, मोठमोठ्या आवाजात गाणी लावली जातात. मग हिंदूंच्या मिरवणुकांच्यावेळी जी वाद्ये वाजविली जातात, त्यास मुस्लीम समाजाचा आक्षेप का? एका समाजाचे वाद्ये वाजविणे, ‘हराम’ आणि मुस्लीम समाजाचे वाद्ये वाजविणे, ‘हलाल’हे कसे चालेल? तसेच मुस्लीम समाजाकडून काढण्यात येणार्या मिरवणुकांमध्ये तलवारी परजून दुसर्या समाजास आव्हान देण्याची भाषा कशासाठी? आम्ही वाद्ये वाजविली, तर चालतील, पण बाकी कोणी वाजवायची नाहीत. हा ढोंगीपणा, दुटप्पीपणा झाला. आपल्या या वर्तनावर मुस्लीम समाजाने गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.
ममता बॅनर्जी म्हणजे हिटलरचा अवतार : सुकांत मजुमदार
“प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हुकूमशाह असून, त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. त्यांची सर्व पावले हुकूमशहासारखी पडत आहेत. त्या आपल्या विरोधकांची गळचेपी करीत आहेत,” असा आरोप बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सुकांत मजुमदार यांनी केला आहे. अलीकडेच झालेल्या पंचायत निवडणुकांमध्ये विविध पक्षांच्या अनेक उमेदवारांना बळजबरीने आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावे लागले. पंचायत निवडणुकांच्यावेळी झालेल्या हिंसाचाराच्या दरम्यान ममता बॅनर्जी या मौन बाळगून होत्या. तृणमूल काँग्रेसच्या गुंडांना मोकळे रान मिळावे, म्हणून त्यांनी सोयीस्करपणे मौन बाळगले होते, असेही भाजप प्रदेशाध्यक्षांनी म्हटले आहे. भाजप कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची करणे आणि २०२४ साली होणार्या लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान कार्यकर्त्यांनी पूर्ण शक्तीनिशी काम करू नये, म्हणून या तंत्राचा वापर तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला. पंचायत निवडणुकीच्या वेळी तृणमूलच्या गुंडांनी मतदान केंद्रांवर हल्ले केले. मतपत्रिका लुटून नेल्या, मतदान केंद्रांवरील अधिकारी आणि अन्य कर्मचार्यांना धमकाविले. बोगस मतदान करू न दिल्यास ठार केले जाईल, अशा धमक्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना देण्यात आल्या.
अनेक मतदान केंद्रांवर असे गैरप्रकार घडले. बंगालमध्ये ३० टक्के मुस्लीम मतदार आहेत. तृणमूल काँग्रेसने भ्रष्टाचार केला, तरी राज्यातील बहुतांश मुस्लीम मतदार तृणमूल काँग्रेसच्या पारड्यातच मते टाकणार! अवघ्या काही टक्के मुस्लीम मतदारांनी डावे पक्ष, काँग्रेस किंवा अन्य पक्षांच्या उमेदवारांना मते दिली, असे डॉ. मजुमदार यांनी म्हटले आहे. “तृणमूल काँग्रेसकडून रोहिंग्या मुस्लिमांना सर्व प्रकारचा पाठिंबा मिळत आहे. त्यातूनच चोवीस परगणामधील तृणमूल नेते त्या भागात रोहिंग्या कुटुंबांना वसवत आहेत. पाच-दहा वर्षांच्या नंतर हे आपलेच मतदार होणार आहेत, हे त्यांना पुरते माहीत आहे. बंगालमध्ये आम्ही लोकसभेच्या ३५ जागा लढविणार आहोत. त्याप्रमाणे आमची तयारी सुरू आहे. २०२१च्या विधानसभा निवडणुकीनंतर संघटना बळकट करण्यास आम्हाला कमी वेळ मिळाला. २०१९च्या निवडणुकीत मोदी लाट असल्याने आमची संख्या दोन वरून १८ वर गेली,” असे ते म्हणाले. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या गुंडशाही, हिटलरशाहीला भाजपने एक प्रकारे आव्हान दिले आहे. तृणमूल काँग्रेस सरकारचा अनुभव लक्षात घेता, त्या पक्षास जोरदार टक्कर देण्याची तयारी भारतीय जनता पक्षाने केली आहे.
रोहिंग्या मुस्लिमांची आसाममार्गे भारतात घुसखोरी!
रोहिंग्या मुस्लिमांची भारतात मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत आहे. या रोहिंग्या मुस्लिमांनी भारताच्या विविध भागांमध्ये अनधिकृत वस्ती केली आहे. रोहिंग्यांच्या या समस्येवर आसामचे मुख्यमंत्री हिमंत विश्व सरमा यांनी नव्याने प्रकाश टाकला आहे. “त्रिपुरामधील दलालांच्या मदतीने हे रोहिंग्या आसाममध्ये प्रवेश करतात आणि तेथून ते दिल्ली, काश्मीरकडे जातात,” असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. “त्रिपुरामधील काही दलाल या रोहिंग्या मुस्लिमांना सुरक्षितपणे भारतात आसाममार्गे पोहोचविण्याचे काम करतात. काही वर्षांपूर्वी आसाममध्ये बांगलादेशातून होणारी घुसखोरी पूर्णपणे थांबली होती. पण, आता पुन्हा घुसखोरी होऊ लागली आहे. रोहिंग्या घुसखोरांचा केवळ बंदोबस्त करून भागणार नाही, तर त्यांना भारतात घेऊन येणार्या दलालांचे जाळे पूर्णपणे उद्ध्वस्त करायला हवे. बराक खोर्यातील तीन जिल्ह्यांमधील प्रशासनाने सतर्क राहून या घुसखोरांना परत, तर पाठविलेच पाहिजे; पण त्याचबरोबर त्रिपुरा राज्यात जाऊन दलालांविरुद्ध कारवाई करून त्यांचा कणा मोडला पाहिजे,” असेही मुख्यमंत्री सरमा यांनी म्हटले आहे.
रोहिंग्या हे मूळचे म्यानमारमधील. तेथील लष्करी राजवटीने त्यांच्याविरुद्ध कारवाई केल्याने त्यांनी अन्य देशांत पलायन केले. त्यातील हजारो रोहिंग्या बांगलादेशात आश्रयाला आहेत. भारतामध्येही या रोहिंग्या मुस्लिमांनी घुसखोरी केलेली दिसते. या रोहिंग्या मुस्लिमांमुळे भारताच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असून त्यातील अनेकांचे इस्लामी दहशतवाद्यांच्या संघटनांशी संबंध उघडकीस आले आहेत. त्यामुळे आपल्या देशाच्या सीमांवर अत्यंत कडक बंदोबस्त ठेवला तरच रोहिंग्यांच्या घुसखोरीला आळा बसेल.
दत्ता पंचवाघ
९८६९०२०७३२