मुंबई : राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची निवड करण्यात आली असून तसे आदेश राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत दिले. दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची महिला अध्यक्षपदी करण्यात आली असून पक्षप्रतोदपदी अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी याबाबत घोषणा केली. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधीमंडळाचे नेते म्हणून नियुक्त करण्यात आले असल्याचे प्रफुल्ल पटेल म्हणाले.
दरम्यान, नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून नव्या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली असून महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते म्हणून आ. अमोल मिटकरी आणि उमेश पाटील, सुरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, युवक राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी सुरज चव्हाण यांची निवड पक्षाकडून करण्यात आली आहे.