फ्रान्समध्ये सुरु असलेल्या दंगलींवरुन आगामी काळात युरोपीय देशांमध्ये कट्टरतावादी मुस्लिमांचा धुडगूस वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकसंख्या कमी असताना शांत राहणे आणि लोकसंख्या वाढली की, आपल्या धर्माचा अजेंडा राबवण्यासाठी कोणत्याही थराला जाणे, हे मुस्लिमांचे धोरण असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. भारतामध्येही अशा प्रकारांचा सामना करावा लागला आहे.
पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १७ वर्षीय नाहेल एमचा मृत्यू झाल्यानंतर फ्रान्समध्ये देशभरात दंगली उसळल्या. शनिवारी नाहेलवर अंत्यसंस्कार करण्यात आले, तेव्हाही हिंसाचार उफाळून आला. नाहेल हा धर्माने मुस्लीम होता आणि तो आफ्रो-फ्रेंच नागरिक होता. या दंगलीनंतर आता सोशल मीडियावर मुस्लिमांना लक्ष्य केले जात आहे. युरोपातील बडे नेते त्याचा थेट संबंध आफ्रिकन आणि मुस्लीम निर्वासितांच्या आगमनामुळे निर्माण झालेल्या समस्येशी जोडत आहेत. सोशल मीडिया अशा पोस्ट्सने भरलेला आहे, ज्यामध्ये मुस्लीम निर्वासित कोणत्याही देशाचे नियम पाळत नाहीत आणि हिंसाचार करतात, असाच सूर कानी पडतो. अशा हिंसाचाराची आग इतर देशांमध्ये पसरू नये, अशी चिंता युरोपमध्येही व्यक्त केली जात आहे. फ्रान्समधील हिंसाचाराचा व्हिडिओ शेअर करताना ब्रिटनचा पक्ष ‘ब्रिटन फर्स्ट’चे नेते पॉल गोल्डिंग यांनी लिहिले की, “दंगलखोरांनी फ्रान्समधील पोलीस स्टेशनवर रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड फेकले. जर हे गृहयुद्ध नसेल, तर ते काय आहे; ते आपल्याला माहीत आहे. संपूर्ण जगाचा सोशल मीडिया फ्रान्समध्ये हिंसाचाराने भरलेला आहे. यामध्ये फ्रान्सच्या एका मोठ्या सार्वजनिक वाचनालयालाही आग लावण्यात आली, त्याची तुलना नालंदा विद्यापीठावरील हल्ल्याशी केली जात आहे.”
पोलंडचे पंतप्रधान मातेउझ मोराविकी यांनीही फ्रान्समधील दंगलींवर टीका केली आहे. त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे; ज्यामध्ये फ्रान्स जळताना दिसत आहे आणि व्हिडिओच्या मध्यभागी शांतता आणि शांत पोलंड दिसते. पोलंड हा युरोपमधील अशा काही देशांपैकी एक; ज्यात एकही अवैध मुस्लीम निर्वासित नाही. दंगलीनंतर पोलंडचे नेते डोमिनिक टार्झिन्स्की यांची जुनी टीव्ही मुलाखत व्हायरल झाली आहे, ज्यामध्ये ते म्हणतात की, “पोलंडने शून्य मुस्लीम निर्वासितांना देशात प्रवेश दिला आहे.‘’ यावर वृत्तनिवेदकाने विचारले की, “तुम्हाला याचा अभिमान आहे का?” त्यावर ते म्हणाले की, अवैध मुस्लीम नसल्यामुळे आपला देश सुरक्षित आहे आणि देशात दंगल किंवा दहशतवादी हल्ला झाला नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.
या दंगलीमुळे नेदरलँड्सचे उजव्या विचारसरणीचे खासदार गीर्ट वाइल्डर्सही मुस्लिमांना लक्ष्य करत आहेत. शनिवारी एका ट्विटमध्ये ते म्हणाले की, “जर तुम्ही जिहाद आयात केलात, तर तुम्ही खलिफात बनल्याबद्दल आश्चर्यचकित होऊ नका.” गिरटने दंगलीशी संबंधित अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. दुकाने लुटली जात असल्याचा व्हिडिओ ट्विट करत त्यांनी लिहिले की, ’मल्टी कल्चरल लूटिंग.’ एका ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, “स्वीडनमध्ये कुराण जाळल्यामुळे इस्लामिक सरकारे आणि मुल्ला संतापले आहेत. परंतु, त्यांच्या ’हिंसक विचारसरणी’चे पालन करणारे लोक फ्रान्सला जाळत आहेत.‘’
फ्रान्समध्ये गेल्या काही वर्षांत इस्लामिक दहशतवाद्यांचे हल्ले वाढले आहेत. तज्ज्ञांच्या मते, यामुळेच फ्रान्सला कट्टरपंथी हल्लेखोरांकडून प्रचंड दबावाचा सामना करावा लागत आहे. २०२१ मध्ये फ्रान्सच्या नाईस शहरातील चर्चमध्ये चाकू हल्ला झाला होता, ज्यामध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला. संशयित हल्लेखोर वारंवार ‘अल्ला हू अकबर’ म्हणत होता. एका वृद्धाचा गळा चिरून खून करण्यात आला. संशयित हल्लेखोर हा ट्युनिशियाचा असून, तो ‘अल्ला हू अकबर’चा नारा देत होता. ही व्यक्ती निर्वासिताच्या नावाने फ्रान्समध्ये पोहोचली होती. याआधी एका शिक्षकाने प्रेषित मुहम्मद यांचे वादग्रस्त व्यंगचित्र मुलांना दाखवल्यामुळे त्याची हत्या करण्यात आली होती. या हत्येने संपूर्ण फ्रान्स हादरला. २०१५ मध्ये इस्लामिक दहशतवाद्यांनी ‘शार्ली हेब्दो’ मासिकाच्या कार्यालयावर हल्ला करून १२ जणांना ठार केले होते. त्याच वर्षी ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक’च्या दहशतवाद्यांनी संपूर्ण पॅरिसवर हल्ला केला. यामध्ये १३० लोकांचा मृत्यू झाला, तर शेकडो लोक जखमी झाले होते. यापूर्वी, ‘इस्लामिक स्टेट’च्या एका दहशतवाद्याने गर्दीवर एक महाकाय लॉरी चालवून ८६ लोकांना मारले होते.
आदर्श लोकशाहीच्या स्वप्नाळू धोरणाच्या नावाखाली फ्रान्ससह युरोपातील अनेक देशांनी अरब आणि आफ्रिकन देशांतून येणार्या निर्वासितांना स्थान दिले. यामध्ये ते स्थलांतरितही होते, ज्यांना इस्लामिक देशांनाच त्यांच्या तुरुंगात टाकायचे होते. दुसरीकडे फ्रान्सला अभिमान होता की, त्याच्या धर्मनिरपेक्ष लोकशाही राजवटीत कोणत्याही नागरिकाशी धर्म किंवा वंशाच्या आधारावर भेदभाव केला जात नाही. मात्र, तेथेच फ्रान्सची मोठी चूक झाली होती. २०२१ मध्ये युरोपच्या एकूण लोकसंख्येपैकी पाच टक्के मुस्लीम होते, जे सुमारे २६ दशलक्षांपर्यंत पोहोचले. गेल्या तीन वर्षांत ही संख्या आणखी वाढली आहे. युरोपचा विचार करता, फ्रान्समध्ये सर्वाधिक नऊ टक्के मुस्लीम आहेत. त्यापाठोपाठ स्वीडनचा क्रमांक आठ टक्के आहे, तर पूर्व युरोपीय देश पोलंड आणि हंगेरीमध्ये मुस्लीम लोकसंख्या खूपच कमी आहे.
अनेकवेळा असा दावा केला जातो की, युरोप मुस्लिमांच्या ताब्यात जाईल. स्थलांतर असेच चालू राहिले, तरी २०५० पर्यंत युरोपातील एकूण लोकसंख्येपैकी केवळ १४ टक्के लोक मुस्लीम असतील. यामुळे आगामी काळात युरोपीय देशांमध्ये कट्टरतावादी मुस्लिमांचा धुडगूस वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकसंख्या कमी असताना शांत राहणे आणि लोकसंख्या वाढली की, आपल्या धर्माचा अजेंडा राबवण्यासाठी कोणत्याही थराला जाणे, हे मुस्लिमांचे धोरण असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. भारतामध्येही अशा प्रकारांचा सामना करावा लागला आहे. मात्र, युरोपीय देशांच्या तुलनेत भारताने कट्टरतावादी मुस्लिमांचा प्रश्न चांगल्या पद्धतीने हाताळला असल्याचेच आता सिद्ध होत आहे.