पुणे : पुणे पोलिसांनी चार दिवसांपूर्वी ‘इसिस’ या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी निगडित दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दहशतवाद्यांनी आंबोलीच्या गर्द जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केली होती.
तर त्याच्याआधी काही दिवस ते निपाणी आणि संकेश्वर परिसरात वास्तव्यास होते, असे उघडकीस आले आहे. त्यांना आश्रय देणाऱ्यांचीही पुणे पोलिसांनी चौकशी चालवली आहे. पुणे एटीएसच्या पथकाने मंगळवारी (25 जुलै) आंबोलीच्या जंगलात येऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्याठिकाणी काही महत्त्वाचे धागेदोरे या पथकाच्या हाती लागले आहेत, अशी माहिती देखील मिळते आहे. हे दहशतवादी तब्बल चार दिवस आंबोलीच्या जंगलातही वास्तव्यास होते, असेही कळते आहे.