मुंबई (विशेष प्रतिनिधी): रत्नागिरीत टॅग केलेल्या बागेश्री आणि गुहा या ऑलिव्ह रिडले कासवांच्या समुद्र सफरीवर सर्वांचे लक्ष आहे. बागेश्री या कासवीणीने श्रीलंकेपर्यंत मजल मारली असुन तिची सध्या श्रीलंकेच्या पाण्यात भ्रमंती सुरु आहे. गुहाशी मात्र दि. २३ जूलैपासुन संपर्क तुटलेला आहे.
कांदळवन कक्षाच्या ताज्या अपडेटनुसार बागेश्री श्रालंकेच्या पाण्यामध्ये भ्रमंती करताना दिसत आहे. तिने या पाण्यात श्रीलंकेजवळ भ्रमंतीची दोन वर्तुळे पुर्ण केली असुन आता ती तिसऱ्याही वर्तुळ पुर्ण करण्याच्या तयारीत आहे.
मात्र, अनेपक्षितरित्या गुहा या लक्षद्वीपजवळ असलेल्या कासवीणीच्या सॅटेलाईट ट्रान्समीटरने रविवार दि. २३ जूलैपासुन प्रतिसाद देणं थांबवलं आहे. गुहा कासवीणीने टॅग केल्यानंतर १५५ दिवस आपले संकेत ट्रान्समीटर द्वारे दिले मात्र, आता तिच्याशी संपर्क तुटलेला आहे. दरम्यान, बागेश्रीच्या सफरीकडे अद्यापही सर्वांचे डोळे लागले असुन तिची पुढील सफर औत्सुक्यपुर्ण राहिल.