‘आले मराठे’ गाणे दिग्पाल लांजेकरांनी ५ मिनिटांत लिहिले...

28 Jul 2023 11:57:25

digpal lanjekar 




मुंबई :
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ या चित्रपटातून तानाजी मालूसरेंच्या शौर्याची गाथा मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. इतिहासाच्या पुस्तकात वाचलेला इतिहास रुपेरी पडद्यावर मांडण्याचे काम ‘शिवराज अष्टक’ मार्फत दिग्पाल लांजेकर करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी सुभेदार चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. आणि या चित्रपटातील ‘आले मराठे’ हे दुसरे गाणे देखील नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
 
सुभेदार चित्रपटातील आले मराठे हे गाणे स्वत: दिग्पाल लांजेकर यांनी लिहिले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे दिग्पाल यांनी केवळ पाच मिनिटांत हे गाणे लिहिले आहे. दिग्पाल लांजेकरांच्या 'सुभेदार' चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. १८ ऑगस्ट रोजी चित्रपट महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे. त्यांचे आतापर्यंत आलेले ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’, हे चित्रपट चांगलेच गाजले होते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0