'तुम्हाला मंदिरात फाशी देऊ, जीवंत जाळू'; मुस्लिम युथ लीगच्या UCC विरोध रॅलीत घोषणाबाजी!

26 Jul 2023 14:57:37
Hinduphobic Slogans Raised At IUML Youth Wing Rally

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये 'समान नागरी कायद्यांच्या विरोधात काढण्यात आलेल्या रॅलीत हिंदुविरोधी घोषणा देण्यात आल्या. 'मुस्लिम युथ लीग'ने काढलेल्या या रॅलीत हा प्रकार घडला. दरम्यान संघटनेने आपल्या एका नेत्याला निलंबित केल्याची घोषणा केली आहे. भाजपने या घटनेचा निषेध केला आहे. मात्र कन्हागड येथील रहिवासी यांनी या प्रकरणी अब्दुल सलाम यांना जबाबदार ठरवले आहे. दरम्यान MYL ने डॅमेज कंट्रोलला ही अक्षम्य चूक असल्याचे निवेदन जारी केले आहे.
 
ही घटना कासारगोड जिल्ह्यातील आहे. मुस्लिम युथ लीगने यूसीसीच्या विरोधात रॅली काढली. यामध्ये प्रक्षोभक घोषणाबाजी करण्यात आली. ही संघटना IUML ची युवा शाखा आहे. IUML (इंडियन युनियन मुस्लिम लीग) केरळमधील काँग्रेसची सहयोगी संघटना आहे. राहुल गांधी जेव्हा वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढले तेव्हा IUML चा पाठिंबा त्यांना मिळाला होता. त्यावेळी हिरव्या रंगाचे झेंडे घेऊन मुस्लिम कार्यकर्ते गांधीच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले होते. तसेच हा राजकीय पक्ष 'I.N.D.I.A' या विरोधी आघाडीचाही एक भाग आहे.


 
घोषणाबाजीदरम्यान, हिंदूंना त्यांच्या मंदिरासमोर फाशी देण्यात येईल आणि नंतर जिवंत जाळण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली. या घटनेचा निषेध करताना भाजप नेते अमित मालवीय म्हणाले की, केरळमधील मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या सरकारने अशा घटकांना पाठिंबा दिला नसता तर अशा घोषणा दिल्या नसत्या. त्यामुळे केरळमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन सुरक्षित आहेत का? असा सवाल ही त्यांनी यावेळी विचारला . तसेच त्यांनी आठवण करून दिली की काही महिन्यांपूर्वी एका मुलाने वडिलांच्या खांद्यावर बसून 'हिंदूंनी आणि ख्रिश्नांनी आपल्या अंत्यसंस्काराची तयारी करावी' , अशा घोषणा दिल्या होत्या.

अमित मालवीय म्हणाले की, केरळ आता संपूर्ण कट्टरतावादाकडे वाटचाल करत आहे. 'तुम्हाला मंदिरात फाशी देऊ' आणि 'तुम्हाला जाळून टाकू' अशा घोषणांचा निषेध केला पाहिजे. आणि यासर्वासाठी राहुल गांधींना जबाबदार धरले पाहिजे, असे ही मालवीय म्हणाले. त्याचवेळी या वादानंतर संघटनेचे सरचिटणीस पी.के.फिरोज यांनी संघटनेच्या विचारसरणीच्या विरोधात असल्याचे सांगत एका सदस्याला निलंबित करण्याची घोषणा केली. मात्र, रॅलीतील अनेक जण प्रक्षोभक घोषणाबाजी करताना दिसले.


Powered By Sangraha 9.0