कोण आहेत अजय हरिनाथ सिंग ज्यांनी विकत घेतला 'लवासा' प्रकल्प?

    26-Jul-2023
Total Views |

Ajay Singh


मुंबई (मोहित सोमण) :
काही वर्षांपूर्वीचे लवासा प्रकरण पुन्हा चर्चेत आल आहे. पर्यावरणाबाबत आक्षेप आणि आवश्यक परवानग्या नसल्याचा आक्षेपाने लवासा स्मार्ट प्लान सिटीचे बांधकाम २०११-१२ पासून थांबले होते. देशातील प्रथम नियोजित लक्झरी पायाभूत सुविधांचे शहर म्हणून लवासाचे चित्रिकरण लोकांच्या डोळ्यासमोर येऊ लागले. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील डोंगराळ भागात वसलेल्या या शहरात सुविधांची पायाभरणी करून मानवासाठी आवश्यक सगळ्या आस्थापना, पायाभूत सुविधा, गृहनिर्माण, रस्ते, सुखसुविधा, लेजर टाईम लक्झरीयस हिल स्टेशन म्हणून लवासा नावारूपास आले. तत्कालीन कायद्याच्या परिपेक्षात न बसल्याने शहराच्या विकासासाठी अनेक अडचणी आल्या.

या संदर्भात हे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याने बांधकाम बंद होते. या प्रकल्पाची संकल्पना म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव घेतले जाते. या सुनियोजित लवासा शहर प्रकल्पाची सुरुवात डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने सुरू केले होते.परंतु बांधकाम थांबल्याने कंपनी बुडीत खात्यात गेली. आणि घर खरेदी ग्राहकांचे, लोन क्रेडिटरचे थकीत पैसे अनुक्रमे ४३८, ९२९ कोटी रूपये कंपनीने परत करण्याचे ठरवले आहे.

नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल (एनसीएलटी) ने या प्रकरणाची २०१८ मध्ये सुनावणी सुरू केली. पाघ वर्षांनी आता डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने यांचे बिडिंग जिंकले.१८१४ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल मिळाला असून कंपनी सगळ्या स्टेक होल्डरचे पैसे परत करून पुढील बांधकाम सुरू करणार आहे. काम थांबण्यासाठी ऑगस्ट 2018 मध्ये इनसोंलवसी बँक करप्‍ट्सी कोड (आयबीसी) अंतर्गत सुनावणी झाली. परंतु एवढ्या मोठ्या डीलची सुरूवात झाल्याने या नियोजित आणि लक्झरीयस हिल स्टेशनची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे.

कोण आहे प्रमोटर अजय अजय हरिनाथ सिंग आणि त्यांची डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी?
डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची स्थापना २००९ मध्ये झाली होती. कंपनीचे २२ डिसेंबर २०१० मध्ये इनकार्पोरेशन २२ डिसेंबर २०१० ला झाल होते. १०० स्क्वेअर किलो मीटर क्षेत्रात पसरलेल्या लवासा प्रकल्पाचा जमिनीचे अधिग्रहण डार्विन कंपनीने केला. डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी समुहा अंतर्गत सुमारे २० पब्लिक लिस्टेड कंपन्या आहेत. पायाभूत सुविधा, बांधकाम, हॉस्पिटालिटी, खाण, रिफायनरी या क्षेत्रातील मुख्य प्रवाहातील कंपनी ओळखली जाते. जेट एअरवेज, एअर उ, शिंपिंग कार्पोरेशन ऑफ इंडियाचा अधिग्रहण प्रस्तावात ही कंपनी दाखल होती. २०२२ मध्ये अनिल अंबानी संचलित रिलायन्स कॅपिटल कंपनी विकत घेण्याच्या प्रस्तावासाठी उपस्थित होती.

याचे प्रमोटर (प्रायोजक) अजय हरिनाथ सिंग हे मुंबई विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. हे मुंबईस्थित उद्योगपती आहेत. अनेक क्षेत्रातील प्रोडक्ट पोर्टफोलिओ उंचावल्याने त्यांनी एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे.बिझनेस टुडेचा वृत्तानुसार सुमारे ८.४ बिलियन ( ६८००० कोटींहून अधिक) संपत्ती या उद्योगसमुहाचा नावावर अस्तित्वात आहे. थोड्या कालावधीत वेल्थ मधील मिळालेली वृद्धी ही या उद्योगसमुहाची खासियत आहे.नोंदणीनुसार या नोंदणीकृत भांडवल ५ कोटी आणि पेड अप भांडवल ५ कोटी रूपये इतके होते.१२ वर्षांपासून असलेल्या या कंपनीचे राहुल धोटे, राकेश विश्वकर्मा हे देखील संचालक आहेत. या कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय अंधेरी मुंबई स्थित आहे.

या नवीन घटनेविषयी अजय सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना 'हे सांगताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या निर्णयामुळे आव्हानात्मक व महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यास मदत होईल. या लवासामुळे पायाभूत सुविधेत जगात भारताचे स्थान उंचावेल. देशबांधणी साठी योगदान देणाऱ्या लवासा प्रकल्पात डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आवश्यक प्रकिया पार पडण्यासाठी सज्ज आहे. आम्ही सगळ्या थकीत रक्कम परत करण्यास सज्ज असून प्रोजेक्टचा वर्किंग कॅपिटल, बांधकाम इतर खर्च तरतूदीसाठी कंपनीने १८१४ कोटी रूपयांचा नवीन प्रस्ताव ठेवला आहे.'असे सांगितले. लवासा या शहराचे नाव देखील 'लक्झरीयस ' या शब्दांमुळे पडले आहे.आरामदायक आधुनिक शहरी सुविधेसोबत वर्किंग कल्चरसाठी देखील माफक किंमतीचा घराचे प्रकल्प करणाऱ्यांसाठी कंपनीचा विचार चालू आहे.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.