मुख्यमंत्री शिंदे पंतप्रधानांच्या भेटीला; 'या' विषयांवर झाली चर्चा!

22 Jul 2023 14:10:23

Eknath Shinde 
 
 
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. मेट्रो, कारशेट, बुलेट ट्रेन तसेच मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाबाबत नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली. कोकणातील समुद्रात जाणारे पाणी दुष्काळग्रस्त भागांकडे वळवता येईल. यावर शासन गांभीर्याने काम करत आहे, ही बाब मोदींच्या कानावर घातल्याचे शिंदेंनी सांगितले.
 

Eknath Shinde 
 
माध्यमांना प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले, "कुटुंबाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची इच्छा होती. यावेळी राज्यात सुरू असलेले प्रकल्प, धारावी प्रकल्प, राज्यातील पावसाची परिस्थिती याबात मोदींनी चर्चा केली. इर्शाळवाडी येथील घटनेबाबत नरेंद्र मोदी यांनी संवेदना व्यक्त केल्या. राज्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीत देखील मोदी यांनी जाणून घेतले. मोठ्या प्रकल्पांवर देखील मोदी यांनी चर्चा केली. केंद्राचे नेहमी राज्याला पाठबळ असते. बंद प्रकल्पांना आम्ही चालना दिली."
 
 
Eknath Shinde
 
"गृहमंत्री अमित शाह यांना देखील भेटणार आहोत. मोदींना भेटून माझ्या वडिलांना चांगले वाटले. माझ्या नातवासोबत मोदी खेळल्याचे शिंदे यांनी सांगितले. पुन्हा मोदी सरकार सत्तेत येतील. देशभरातील लोकांना असे वाटते." असे देखील शिंदे म्हणाले.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0