दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुप्रिसिद्ध पटकथा लेखक श्री रमण यांचे बुधवार दिनांक १९ जुलै रोजी निधन झाले आहे. वयाच्या ७० व्या वर्षी दीर्घ आजाराने च्यांचे निधन झाले. रमण यांनी आपल्या दमदार लेखणीने भारतीय सिनेसृष्टीत छाप सोडली आहे. तेलुगू चित्रपट आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रात रमण यांनी दिलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांची ओळख कायम आहे. मिळालेल्या माहितीनुसार १९ जुलै रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रमण यांच्यावर गेले अनेक दिवस उपचार सुरु होते.
रमण यांच्या उल्लेखनीय कामांमध्ये 'मिथुनम' (२०१२) या चित्रपटाची पटकथा समाविष्ट आहे. या चित्रपटाच्या पटकथेसाठी त्यांना ओळखले जाते. गायक-अभिनेते एसपी बालसुब्रमण्यम आणि लक्ष्मी अभिनीत रोमँटिक ड्रामा चित्रपट याच नावाच्या रामन यांच्या कादंबरीवर आधारित होता.
आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात जन्मलेले श्री रमण एका साप्ताहिक मासिकातील त्यांच्या प्रभावी लेखांमुळे प्रसिद्ध झाले. आपल्या प्रभावी लेखणीने त्यांनी वाचकांना समृद्ध केले होते. अक्षरा थुनिराम या टोपणनावाने त्यांना ओळखले जात होते.लेखनासोबतच स्वतःचे टोपणनाव वापरत त्यांनी इतर अनेक मासिकांमध्ये व्यंगचित्रे रेखाटली. 'जोक्की ज्योती', 'श्री वाहिनी', 'पंढरी' आणि 'मोगली रेकुलू' यांसारख्या अनेक उल्लेखनीय कलाकृती श्री रमणे यांनी लिहील्या आहेत.