मुंबई : मोठ्या विश्रांतीनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. यातच, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. बदलापुरातून मुंबईकडे जाणारी लोकल थांबवण्यात आली आहे. बदलापूर-अंबरनाथदरम्यान पावसाचे पाणी भरल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. तर लोकल मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अंबरनाथ बदलापूर रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. त्यामुळे लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. बदलापूरहून सीएसएमटीच्या दिशेनं वाहतूक ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे पनवेल ते बेलापूर मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.