‘अंकुश’ चित्रपटात झळकणार केतकी माटेगावकर

    17-Jul-2023
Total Views | 110

ketaki mategoankar



मुंबई : '
सारेगमप' या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली लिटील मास्टर केतकी माटेगावर एककीडे गाण्याची आवड जोपासत आहे तर दुसरीकडे आपल्यातील अभिनयालाही जपत आहे. तानी, टाईमपास या चित्रपटातून ताकदीचा अभिनय सादर करणारी केतकी पुन्हा एकदा नव्या चित्रपटात झळकणार आहे. केतकी माटेगावकरची प्रमुख भूमिका असलेला ‘अंकुश’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
 
‘अंकुश’ या चित्रपटाच्या माध्यमातून ओमकार फिल्म्स क्रिएशन्स निर्मिती संस्थेच्या राजाभाऊ आप्पाराव घुले यांची पहिलीच निर्मिती असलेला "अंकुश" चित्रपट ६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाची कथा नामदेव मुरकुटे यांची असून पटकथा व संवाद निशांत नाथाराम धापसे आणि नामदेव मुरकुटे यांचे आहेत, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांचे लेखक सह दिग्दर्शक म्हणून काम केल्यानंतर निशांत नाथाराम धापसे या चित्रपटाद्वारे दिग्दर्शकीय पदार्पण करत आहेत.
 
काय आहे टीझरमध्ये?
 
टीजरमध्ये थरारक बॅकग्राऊंड म्युझिकवर साखळ्या आणि पिस्तुल दिसते. त्यानंतर एक गोळी झाडली जाते. त्याशिवाय पोस्टरवरील केतकी माटेगावकरचे करारी आविर्भावही दिसत असल्यानं या चित्रपटात अॅक्शनपॅक्ड थ्रीलर कथानक पहायला मिळणार याची खात्री पटते. त्यामुळे या चित्रपटाविषयी आता उत्सुकता निर्माण झाली आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरील सुनावणीत काय घडलं? न्यायालयानं कोरटकरला सुनावलं

प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरील सुनावणीत काय घडलं? न्यायालयानं कोरटकरला सुनावलं

(Hearing on Prashant Koratkar's Bail Application) छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आणि इतिहासकार इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणात कोल्हापूर सत्र न्यायालयात प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरील सुनावणीला सुरुवात झाली आहे. प्रशांत कोरटकरला व्हिडिओ कॅान्फरन्सिंगद्वारे सुनावणीसाठी हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने मागील सुनावणीत कोरटकरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामध्ये त्याची रवानगी करण्यात आली होती. यानंतर आज प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर सुनावणी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121