मुंबई : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने चंद्रयान ३ मोहिमेला सुरुवात केली असून दि. १४ जुलै रोजी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी यान अवकाश प्रक्षेपित केले आहे. दरम्यान, चंद्रावर पहिला मानव उतरविण्याचे श्रेय अर्थान अमेरिकास्थित नासा या संस्थेला जाते. १९ ६९ साली नील आर्मर्स्ट्रांगने चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवले. तेव्हापासून आजतागायत चंद्रावरील वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील देशांमध्ये स्पर्धा सुरु झाली.
दरम्यान, सुमारे ४ अरब वर्षांपूर्वी जेव्हा सुर्यमाला तयार झाली त्यानंतर उल्का , धुमकेतू हे ग्रह आणि उपग्रहांवर आदळून त्यावर वादळे निर्माण होऊन तेथे जीवजंतू पोषक वातावरण तयार झाले. तसेच, पृथ्वीचा उपग्रह असलेल्या चंद्रावरदेखील घळ्या असून तेथील वातावरणात वायुंचे प्रमाण नगण्य असेच आहे. त्यामुळे तेथे वातावरणच नसल्यामुळे तेथे ज्याकाही गोष्टी घडतात त्यांचे पुरावे आहेत तसेच राहतात, यामुळेच, चंद्राच्या पृष्ठभागावर पहिले पाऊल ठेवणारे नील आर्मर्स्ट्रांग यांच्या पावलाचे ठसे आजही आहेत, तसेच, ते पृथ्वीच्या अवकाशातून ते दिसतातही असेसुध्दा बोलले जाते.
चांद्रयान ३ मोहिमेतंर्गत चंद्रावरील खनिजे, मानवी जीवनाशी संबंधित धागेदोरे हाती लागतात का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न यामाध्यमातून करण्यात येणार आहे. दरम्यान, चांद्रयान ३ मोहिमेतंर्गत चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा अभ्यास करण्यात येणार आहे. जगातील आतापर्यंत मोजक्याच देशांनी चंद्रावर यशस्वी मोहिमा केलेल्या आहेत. परंतु, भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवून तेथील गोष्टींचा अभ्यास करायचे ठरवले आहे.