33 मुस्लीम देशांपेक्षाही जास्त मुस्लीम भारतात! अजित डोवालांनी अरबी नेत्यापुढे केलं वक्तव्य

12 Jul 2023 15:33:39
India Islamic Cultural Center At Delhi Programme

नवी दिल्ली
: राष्ट्रीय सुऱक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी थेट अरबी नेत्यासमोरच मुस्लिमांच्या प्रश्नांवर होणाऱ्या आरोपांचे खंडन केले असून ते म्हणाले , भारतातील मुस्लिम हे सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारतातील मुस्लिमांबाबत चिंता व्यक्त केली होती. त्या वक्तव्यांचे खंडन अजित डोवल यांनी केले आहे. ते म्हणाले, भारतात सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असून जगात देश दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे ते म्हणाले. तर ३३ मुस्लिम देशांतील एकूण लोकसंख्येएवढे मुस्लिम हे फक्त भारतात आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, अजित डोवाल इंडिया इस्लामिक कल्चरल सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात उपस्थित होते. ते म्हणाले, भारतात मुस्लिमांबाबत भेदभाव केला जात नाही. तसेच, जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा भारतात मुस्लिमांची लोकसंख्या सर्वाधिक आहे. इतकी लोकसंख्या असण्याचे एकमेव कारणही त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, मुस्लिमांची ही लोकसंख्या इस्लामिक सहकार्याच्या ३३ सदस्य देशांच्या एकूण लोकसंख्येएवढी आहे. या कार्यक्रमावेळी सौदी अरेबियाचे माजी न्यायमंत्री डॉ मोहम्मद बिन अब्दुलकरीम अल-इशा हेदेखील उपस्थित होते.

माजी न्यायमंत्री डॉ मोहम्मद बिन अब्दुलकरीम अल-इशा हे जगातील मवाळ इस्लामचा आवाज मानला जातो. तसेच, अल-इशा पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून राजधानी दिल्ली येथे इंडिया इस्लामिक कल्चरल सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात ते उपस्थित होते.
 
Powered By Sangraha 9.0