उत्तर प्रदेशात वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक

11 Jul 2023 19:57:13
people pelted stones at the Vande Bharat Express 

मुंबई
: उत्तर प्रदेशात वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली असून यात एक्सप्रेसच्या दोन डब्यांच्या खिडक्यांच्या काचा काही प्रमाणात खराब झाल्या आहेत. वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास रौनाही पोलीस स्टेशन हद्दीतील सोहवल परिसरातून जात असताना दगडफेक करण्यात आली आहे. दरम्यान, कर्नाटक आणि प. बंगालनंतर आता वंदे भारत एक्सप्रेसवर उत्तर प्रदेशात दगडफेकीची घटना समोर आली आहे.

या दगडफेकीप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी ट्रेनने धडक दिल्याने शेळ्यांचा कळप खाली पडल्यामुळे आता संताप व्यक्त करण्यासाठी म्हणून एका गटाने वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक केली आणि खिडकीच्या काचा फोडल्या. तसेच, तपासादरम्यान असे आढळून आले की, रविवारी नन्हू पासवान नावाच्या शेळ्यांचा कळप रेल्वे ट्रॅकवर चरत असताना वंदे भारत ट्रेनने धडकल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पासवान आणि त्यांच्या साथीदारांनी ट्रेनला लक्ष्य केले.

 
Powered By Sangraha 9.0