#MahaBudget2023 - अर्थसंकल्पाबद्दल तुमचे अनुभव शेअर करा!

    11-Jul-2023
Total Views |
 
MAHABUDGET2023
 
 
मुंबई : आपल्या सरकारनं आपल्यासाठी सादर केलेल्या 'अमृतकाला'तील 'महाबजेट 2023' मधल्या जनकल्याणकारी योजना तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत ना? तुमचे अनुभव #MAHABUDGET2023 सोबत सोशल मीडियातील विविध प्लॅटफॉर्म मार्फत जरूर शेअर करा. मी वाट पाहतोय... असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
 
केवळ अर्थसंकल्प मांडुन काम संपत नाही, त्यामागे त्याच्या अमलबजावणीची प्रभावी यंत्रणा सुद्धा लागते. असं केलं तरच हा अर्थसंकल्प विधानभवनातुन जनतेच्या दारापर्यंत पोहोचतो. यंदा सादर केलेला अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने जनतेचा अर्थसंकल्प होता. कारण त्यासाठीच्या सुचना देखील जनतेतूनच आमंत्रित करण्यात आल्या होत्या. आता या अर्थसंकल्पातील तरतूदींची अतिशय गतीने अमलबजावणी सुरु झाली आहे.
 
अमृतकालातील या अर्थसंकल्पाचा प्रसार करण्यासाठी, तुम्हाला आवडलेल्या योजनांची माहिती व्हिडीओ स्वरुपात, शॉर्टस, रील या स्वरुपात तयार करा, व #MAHABUDGET2023 सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करा.