'हे' करणार आदिपुरुष चित्रपटाच्या दहा हजार तिकिटांचे मोफत वाटप !

08 Jun 2023 19:31:47

aadipurush


मुंबई :
सध्या आदिपुरुष या रामायणावर आधारित चित्रपटाची बरीच चर्चा भारतभर पहायला मिळत आहे.'सुपरस्टार' प्रभास'ने यात भगवान श्रीरामांची भूमिका साकारली आहे. तर नायिका कीर्ती मेनन हिने माता सीतेची भूमिका साकारली आहे.मराठमोळा देवदत्त नागे यात भगवान हनुमानाची भूमिका साकारताना दिसून येत आहे. हा सिनेमा आपल्या भेटीला चित्रपटगृहात १६ जूनला येणार आहे.





 .हा चित्रपट प्रत्येकाने अनुभवायला हवा.असे ट्विट करत,'द काश्मीर फाईल्स' आणि 'कार्तिकेय २' चित्रपटाचे निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी तामिळनाडूत १०००० तिकिटांचे वाटप करण्याची घोषणा केली आहे.वृद्धाश्रम,अनाथालय आणि सरकारी शाळेत ते या तिकिटांचे वाटप करणार आहेत.'भगवान श्रीरामांच्या जीवनातील प्रत्येक क्षण हा मानवतेला शिकवण देणारा आहे.त्यामुळे या जूनमध्ये सर्वानी हा चित्रपट सिनेमागृहात अनुभवायला हवा". असेही ते म्हणाले.















Powered By Sangraha 9.0