मुंबई : ठाकरे आणि पाटणकर कुटुंबीयांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले असून ठाकरे आणि पाटणकर हे दोघे बिझनेस पार्टनर आहेत, असा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच, बिझनेस पार्टनरशिप फर्म्स, रिलेशनशिप आणि मनी लॉंड्रिंगसाठी लेयर उभी करण्यात ठाकरे आणि पाटणकर कुटुंबीयांचा सहभाग असल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे.
दरम्यान, उध्दव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर आणि त्यांचे व्यावसायिक भागीदार नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या कोलकाता, मुंबई या ठिकाणी कार्यालयावर सीबीआयची छापेमारी झाल्याचे किरीट सोमय्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी हिशेब द्यावाच लागेल, असे भाजप नेते किरीट सोमय्या पत्रकार परिषदेत म्हणाले.