बुडाला औरंग्या पापी...!

07 Jun 2023 21:50:14
Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis statement

“औरंगजेबाचे फोटो झळकविणे मान्य केले जाणार नाही. या देशात आमचे आराध्य दैवत हे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजच असू शकतात. त्यामुळे कोणी औरंग्याचं नाव घेत असेल तर त्याला माफी नाही,” अशी स्पष्ट भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री तेथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. त्यामुळे औरंग्याप्रेमी मुस्लिमांनी आपल्या मूळ स्वभावाचा त्याग करण्याची गरज निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रात सध्या परकीय आक्रमक औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचा रोग धर्मांध मुस्लिमांमध्ये बळावलेला दिसतो. यापूर्वीही हा रोग त्यांच्यात होताच, मात्र सध्या त्याचे प्रमाण वाढल्याचे स्पष्टपण दिसून येते. औरंगजेब हा इस्लामी रानटीपणाचे मूर्तिमंत प्रतीक. हिंदूंचा द्वेष करणे हेच त्याच्या जीवनाचे इतिकर्तव्य होते. स्वत:च्या बापास कैदेत टाकणे आणि सख्ख्या भावास मारून टाकणे, हा तर त्याच्यासाठी डाव्या हातचा मळ होता. स्वत:ला ‘बुतशिकन’ असे म्हणवून घेणार्‍या औरंगजेबाने हिंदू द्वेषासाठी अगणित मंदिरे उद्ध्वस्त केली. मंदिरे उद्ध्वस्त करून त्यातील देवतेची मूर्ती फोडण्यात त्याला समाधान लाभत असे. त्यासोबतच हिंदूंवर जिझिया कर लादणे, भारतास इस्लाममय करण्याचे स्वप्न पाहणे, त्यासाठी बळजबरी धर्मांतरणे घडविणे हेही उद्योग त्याच्या कार्यकाळात झाले. मात्र, भारतीय इतिहासातील अत्याधिक किळसवाण्या अशा या राज्यकर्त्यास नेहरू काळातील पोटार्थी इतिहासकारांनी मात्र टोप्या विणून उपजीविका करणारा दयाळू सम्राट असे त्याचे वर्णन केले. त्या काळात देशातील विद्यापीठे आणि अभ्यासक्रम ठरविणार्‍या सरकारच्या समित्यांवरही या पोटार्थी इतिहासकारांची वर्णी लावण्याची प्रथा असल्याने स्वतंत्र भारतातील अनेक पिढ्यांना ‘दयाळू औरंगजेब’ अशीच त्याची ओळख होत राहिली.

तसे असले तरीही औरंगजेब नेमका कोण होता आणि त्याचे मनसुबे नेमके काय होते, हे अनेकांनी लिहून ठेवलेले असल्याने औरंगजेबास ‘जागतिक शांतीची पुरस्कर्ता’ अशी उपाधी देण्याचे पोटार्थी इतिहासकारांचे मनसुबे पूर्ण होऊ शकले नाहीत. मात्र, तरीदेखील देशातील मुस्लीम समाजातील मोठ्या टक्क्याच्या मनात आजही औरंगजेब जीवंत आहे. केवळ औरंगजेबच जीवंत नसून त्याचे जिहादी मनसुबेदेखील त्यांनी आपल्या मनात जीवंत ठेवले आहेत. भारताचे इस्लामीकरण करण्याचे औरंगजेबाचे महान कार्य अपूर्ण असून ते आपल्यालाच पूर्ण करायचे आहे, हा विकृत विचार जिहादी मुस्लिमांच्या मनात कायमच जीवंत राहिला आहे. त्यामुळे भारतात राहूनही वेगळी देशविघातक भूमिका घेण्याची एकही संधी हे औरंगजेबवादी मुस्लीम सोडत नसतात. तसा विचार करायला गेलो, तर द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडणारे सर सय्यद अहमद खान असो, पुढे त्या विचारास राजकीय जोड देणारे जिना असो, ९०च्या दशकात काश्मिरी हिंदूंचे शिरकारण करणारे मुस्लीम असो, मदरशांमधून कट्टरतावाद शिकविणारे मौलाना- मौलवी असो; या सर्वांच्या मनात एक वेगळेपणाची भावना कायमच राहिली आहे. या वेगळेपणाच्या भावनेचा प्रणेता हा औरंगजेबच होता, यात कोणतीही शंका नाही!

जिहादी कट्टरतावादी मुस्लिमांच्या मनात आजही औरंगजेबाचे स्थान हे मोठे आहे. ते त्याला भारताचा अखेरचा सम्राट मानतात, भारतावर केवळ मुस्लिमांनीच राज्य केले, आम्ही राज्यकर्ती जमात आहोत, आम्ही हिंदूंवर राज्य केले, हिंदू आमच्यापेक्षा दुय्यम आहेच हे आणि असे अनेक गैरसमज आजही मुस्लिमांच्या मनात घर करून आहेत. त्यामुळेच औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याची एकही संधी हे लोक सोडत नाहीत. समाजमाध्यमांवर औरंगजेबाची स्तुती करणे, फेसबुक अथवा इन्स्टाग्रामवर त्याचे रिल्स प्रसिद्ध करणे हे प्रकार मुस्लीम समाजातील कट्टरतावादी तरुण करताना दिसतात.

त्यासोबतच कोणत्याही धार्मिक मिरवणुकांमध्ये जाणीवपूर्वक औरंगजेबाचे पोस्टर्स नाचविणे, हा नवाच पॅटर्न सध्या महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे. नुकतीच अशी घटना राज्यातील अहमदनगरमध्ये घडली. फकीरवाडा भागात संदल उरुसच्या मिरवणुकीत मुघल बादशाह औरंगजेबाच्या प्रतिमेचे फलक झळकवत काही तरुणांनी नाच केला आणि घोषणाबाजी केल्याची घटना घडली. त्यापूर्वीही फेसबुक या समाजमाध्यमावर एका हिंदू तरुणाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पायाशी औरंगजेब असे चित्र प्रसिद्ध केल्यावरून मुस्लिमांनी त्याच्याविरोधात त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार दाखल करून हिंदू तरुणावर गुन्हा दाखल करवून घेतला होता. त्यामुळे या लोकांच्या मनात औरंगजेब पक्का बसला आहे आणि त्यामुळेच स्वत:चे वेगळे अस्तित्व दाखवून देण्यासोबतच हिंदू समाजाला डिवचण्यासाठी जाणीवपूर्वक औरंगजेबास नाचविण्याचे प्रकार केले जात असल्याचे दिसून येते. औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर केल्यापासून तर हे औरंग्याप्रेमी आणि त्यांचे आका चांगलेच पिसाळले असल्याचे दिसून आले आहे.

महाराष्ट्रामध्ये औरंग्याप्रेमींवर योग्य तो इलाज केला जाईल; अशी शाश्वती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय स्पष्ट शब्दात दिली आहे. ही कारवाई नेमकी काय असेल, हे येत्या काही काळात स्पष्ट होईलच. मात्र, महाराष्ट्रामध्ये औरंग्याचे उदात्तीकरण करणार्‍यांनी एक गोष्ट कायमच लक्षात ठेवणे गरजेचे आहे. ती म्हणजे औरंग्यास आव्हान देणे आणि त्याची कबर खोदणे, या दोन्ही घटनांचा महाराष्ट्राशी अतुट असा संबंध आहे.

आग्र्यामध्ये जाऊन औरंगजेबास त्याच्याच दरबारात आव्हान देऊन त्याला घाम फोडण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले होते. पुढे धर्मवीर संभाजी महाराजांनी तर औरंगजेबास दक्षिणेत उतरण्यास भाग पाडले आणि जंगजंग पछाडले. त्यानंतरही छत्रपती राजाराम, महाराणी ताराराणी यांनीही औरंग्यास खेळवले आणि पुढे तर मराठ्यांनी औरंगजेबाचे शब्दश: खेळणे केले होते. त्यामुळे सम्राट औरंगजेब मराठ्यांच्या पराक्रमापुढे अगदीच दुबळा ठरून येथेच मेला होता. खरेतर त्याहीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतरच औरंगजेबाच्या वाईट दिवसांना प्रारंभ झाला होता. हिंदवी स्वराज्य बुडविण्यास आलेला औरंग्या पापी स्वत:च बुडाला होता. त्यामुळे आता पुन्हा त्याच पराभूत औरंग्याचे उदात्तीकरण करून जिहादी कट्टरतावादी मुस्लिमांनाही बुडायचे असेल, तर त्यासाठी त्यांना शुभेच्छाच द्यायला हव्यात!

Powered By Sangraha 9.0