औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचला एमआयएम शहरप्रमुख!

05 Jun 2023 15:23:51

Aurangjeb


अहमदनगर :
अहमदनगर शहरातील फकिरवाडा शहरात औरंगजेबाचा घेऊन फोटो मिरवणूकीत नाचण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुकूंद नगर परिसरात चादर चढवण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली, यावेळीच एमआयएमचे शहरप्रमुख यांनी हा फोटो हातात घेतला होता. सुफी संत दम बारी हजारी यांच्या दर्ग्याजवळ ही मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

अहमदनगरच्या फकीरवाडा शहरात रविवारी रात्री उरूस काढण्यात आला होता. चादर चढवण्यासाठी या भागात मिरवणूक निघाली होती. यावेळी काही तबलिगी जमातचे सदस्य यावेळी उपस्थित होते. यावेळी औरंगजेबाचे फोटो अभिमानाने मिरवण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. यावर कठोर कारवाईची मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. आमचं आराध्य दैवत छ.शिवाजी महाराज आणि छ.संभाजी महाराजच आहेत, कुणीही इथे औरंग्याचे फोटो घेऊन नाचत असेल तर त्याची गय केली जाणार नाही, असा कडक शब्दांत इशारा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

Powered By Sangraha 9.0