मुंबई : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे १ जुलै रोजी मुंबई महापालिकेवर भव्य मोर्चा काढणार असून, आदित्य ठाकरे यांच्या या मोर्चाला महायुती देखील आता प्रत्युत्तर देणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या मोर्चा विरोधात भाजप युवा मोर्चाने रस्त्यावर उतरण्याची रणनिती आखली असून, या मोर्चात भाजपसोबत शिवसेना आणि आरपीआय देखील सहभागी होणार आहे.
शनिवारी भाजपच्या नरिमन पॉईंट येथील प्रदेश कार्यालयातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. मागील 25 वर्षात सत्तेत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जो भ्रष्टाचार केला त्याची पोलखोल महायुती या प्रत्युत्तर मोर्चातून करणार आहे, अशी माहिती युवा मोर्चाच्या वतीने देण्यात आली आहे.