जागतिक बाजारातही भारतीय रुपया भारी!

29 Jun 2023 21:25:03
Indian Rupee Growth In Global Market

भारतीय ‘रिझर्व्ह बँके’च्या आयात-निर्यात व्यवहार रुपयात करण्याच्या निर्णयामुळे आपल्या अर्थव्यवस्थेचे अमेरिकी डॉलरवर अवलंबून असणे हळूहळू कमी होणार आहे. त्यामुळे परिणामी आपल्या रुपयाची किंमत अमेरिकी डॉलरच्या तुलनेत स्थिरावेल. कच्चे तेल रशियाकडून आयात केल्यामुळे आपली फार मोठी बचत होत आहे. याच्या परिणामी चलनवाढीला आळा बसू शकेल. ज्या देशांनी आपल्या देशाबरोबर रुपयामध्ये व्यवहार करण्याची तयारी दाखविली आहे, त्या देशांबरोबर आपली आयात-निर्यात वाढेल.

भारतीय रिझर्व्ह बँकेने जुलै २०२२ मध्ये आपले आयात-निर्यात व्यवहार हे भारतीय चलनात म्हणजेच रूपयामध्ये करण्याचे धोरण जाहीर केले. डिसेंबर २०२२ मध्ये रशियाबरोबर खनिज तेल आयातीचा मोठा आंतरराष्ट्रीय व्यवहार झाला. हा व्यवहार यशस्वी झाल्यामुळे, सुमारे १८ देशांनी आपल्याबरोबर अमेरिकी डॉलरऐवजी भारतीय रुपया हे चलन वापरून आयात- निर्यात करण्यास तयार आहेत. हे आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे असून आपल्या अर्थव्यवस्थेवर याचा सकारात्मक परिणाम होणार आहे. सध्या जगातील वेगवेगळ्या देशांतील बहुतांश आयात -निर्यात व्यवहार अमेरिकी डॉलर, ग्रेट ब्रिटन पाऊंड (जीबीपी) व युरो या चलनातही होतात. काही जपानच्या ‘येन’ या चलनातही होतात. त्यामुळे या देशांची चलनं इतर देशांच्या चलनाच्या तुलनेत मजबूत आहेत. रशिया, इंग्लंड, जर्मनी, न्यूझीलंड, ओमान, सिंगापूर, श्रीलंका, मॉरिशस आणि अन्य आशिया आणि आफ्रिका खंडांतील देशांनी आपल्या देशाबरोबर रुपया या चलनात व्यवहार करण्यास संमती दर्शवली आहे. हे आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने फार चांगले लक्षण म्हणावे लागेल. आपली नियार्र्त वाढत असली तरी डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असल्याने आपल्याला अपेक्षित आर्थिक लाभ होत नसे. तो प्रश्नदेखील काही अंशी सुटेल. त्यामुळे रुपयामधील आयात-निर्यात लाभदायक ठरेल.

भारतात वाढीव गुंतवणूक, रोजगार, महागाईवर नियंत्रण, रुपयाचे सबलीकरण असे अनेक फायदे आपल्या देशाला भविष्यकाळात होतील. भारतीय अर्थव्यवस्था चांगली भक्कम व नियंत्रित आहे. यावर सर्वांचा विश्वास आहे. भारताचा आर्थिक भविष्यकाळ हादेखील उज्वल असेल, याची खात्री बर्‍याच देशांना पटली आहे. जागतिक सतरावरील युरोप व अमेरिका यांच्या अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत आहेत. रशिया-युक्रेन युद्धाचा यांच्या अर्थव्यवस्थांवर बराच परिणाम झाला. तितका तो आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला नाही. जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा यांच्या आर्थिक वृद्धीचा दरही मंदावत आहे. याउलट आपल्या देशाची अर्थव्यवस्था ६.५ टक्के दराने विकसित होणार असून, आज आपली अर्थव्यवस्था ही जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. कोणत्याही देशाला भारताला विसरून अथवा भारताला विरोध करून आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही.
 
भारतीय ‘रिझर्व्ह बँके’च्या आयात-निर्यात व्यवहार रुपयात करण्याच्या निर्णयामुळे आपल्या अर्थव्यवस्थेचे अमेरिकी डॉलरवर अवलंबून असणे हळूहळू कमी होणार आहे. त्यामुळे परिणामी आपल्या रुपयाची किंमत अमेरिकी डॉलरच्या तुलनेत स्थिरावेल. कच्चे तेल रशियाकडून आयात केल्यामुळे आपली फार मोठी बचत होत आहे. याच्या परिणामी चलनवाढीला आळा बसू शकेल. ज्या देशांनी आपल्या देशाबरोबर रुपयामध्ये व्यवहार करण्याची तयारी दाखविली आहे, त्या देशांबरोबर आपली आयात-निर्यात वाढेल. भविष्यात इतर देशसुद्धा हळूहळू भारताबरोबर रुपयांत व्यवहार करण्यास तयार होतील. परिणामी, भविष्यात भारतीय रुपया हे एक आंतरराष्ट्रीय चलन होईल. भारतीय उद्योजकांना विकसित देशामध्ये किंवा अन्य विकसित देशांनादेखील भारतात गुंतवणूक करणे सहज शक्य होईल. त्यामुळे भारतात रोजगार वाढू शकतील. भारतीय वस्तू व सेवांना निर्यात करण्यासाठी विकसनशील देशांची बाजारपेठ उपलब्ध होऊ शकेल. यामुळे वित्तीय तूट कमी होऊन आंतरराष्ट्रीय व्यापाराचा समतोल राखणेदेखील सहज शक्य होईल. इतर देशांच्या तुलनेत भारतीय रुपया हा खूप मजबूत आहे आणि तो अजून मजबूत होऊ शकेल.

भविष्यात भारताबरोबर रुपयात व्यवहार करणार्‍या देशांचा एक समूह निर्माण होऊ शकेल व तो समूह अन्य देशांच्या समूहांशी उदाहरणार्थ युरोपियन युनियन, ‘ओपेक’, ‘ब्रिक्स’, ‘नाफ्ता’, ‘आसियान’ यांच्याशी स्पर्धा करू शकेल. ‘ब्रिक्स’ तसेच बहुतांश दक्षिण आशियातील देश याची वाट पाहत आहेत. याचा फायदा आपल्या देशातील विविध सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना होऊ शकेल. या समूहाचे नेतृत्व भारत करेल आणि अमेरिका, चीन यांच्याबरोबरीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताचा प्रभाव पडेल. परिणामी, आपल्या अर्थव्यवस्थेच्या वृद्धीचा दर वाढेल. याचा परिणाम म्हणून येत्या पाच वर्षांनंतर भारत जगातील तिसरी मोेठी अर्थव्यवस्था होऊ शकेल. अमेरिका, चीन, जपान, जर्मनी, भारत व इंग्लंड या जगातील पहिल्या सहा अर्थव्यवस्था आहेत. या सहा अर्थव्यवस्थांत तीन देश ते म्हणजे भारत, चीन व जपान हे तीन देश आशिया खंडातील आहेत. चीन व भारतासारख्या बलाढ्य अर्थव्यवस्थेमुळे आशिया खंडाचे महत्त्व वाढते आहे.

परदेशी बँकांना भारतीय बँकेने ‘वोस्ट्रो’ खाते उघडणे आवश्यक आहे. जेणेकरून रुपयामधील व्यवहार तसेच निवेश यावर नियंत्रण ठेवता येते. जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या यंत्रणांनी भारताच्या अर्थव्यवस्थेेचे नियम, नियंत्रण व इतर देशांच्या तुलनेत जास्त असलेला वृद्धीचा दर यावर समाधान व्यक्त केले आहे. आपल्या पंतप्रधानाची आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली प्रतिमा आहे. भारताची भूमिका, स्थैर्य व नेतृत्व याला आज आंतरराष्ट्रीय क्षेत्रात मान्यता मिळाली आहे. भारताचा पाया मजबूत असल्यामुळे येत्या काळात ‘इंडिया शायनिंग’च राहणार!

Powered By Sangraha 9.0