नवी दिल्ली : देशातर्गंत उत्पादन वाढीसाठी भारत सरकार वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी प्रोडक्ट लिंक इंसेंटिव ही योजना राबवत आहे. आता भारत सरकार ग्रीन ऊर्जेला चालना देण्यासाठी प्रोडक्ट लिंक इंसेंटिव योजना राबवण्याच्या विचारात आहे. ग्रीन ऊर्जेसाठी सर्वात महत्वाचे असलेली ग्रीड बॅटरीचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.
प्रोडक्ट लिंक इंसेंटिव योजनेव्दारे भारत सरकार बॅटरी सेलचे उत्पादन वाढवण्यासाठी २१,६०० कोटी रुपये देणार आहे. सध्या बॅटरीचे उत्पादन करण्यात चीन आघाडीवर आहे. चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारताला घरगुती उत्पादन वाढण्यावर भर द्यावा लागणार आहे.
भारतात काही दिवसांपुर्वीच जम्मू काश्मीरमध्ये बॅटरी बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या लिथियमचे साठे सापडले आहेत. सध्या जगभरात लिथीयम आयन बॅटरीचा वापर करण्यात येतो. लिथियमचे साठे मोठ्या प्रमाणात लॅटिन अमेरिकी देशांत सापडतात.