मुंबई : आषाढीवारीचा महिमा संपूर्ण मराठी संस्कृतीला ज्ञात आहे. वारकरी आणि माळकरी वयोमानानुसार वारीला जाऊ शकत नाहीत तेव्हा यांच्यासाठी पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात प्रतिवारीचे आयोजन साहित्य जल्लोष प्रतिष्ठानने केले आहे. वसईतील विठ्ठल भक्तांनी या वारीत मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे. आषाढी एकादशी निमित्त गुरूवार दि.२९ जून २०२३ रोजी, सायं. ४.०० वा. वसई बस डेपो ते भंडारी नाट्यगृह, पारनाका, वसई या मार्गावर 'वारकरी दिंडी' आयोजित केली आहे. त्यानंतर वसईतील पुरातन विठ्ठल मंदिरात हरिपाठ आणि हरिनाम तसेच अभंगाचे सोहळे होणार आहेत.
वारकर्यांनी या दिंडीत पारंपरिक वारकरी वेशभूषा, सफेद कुडता व पायजमा, टोपी, वाद्य - टाळ, मृदुंग, चिपळी इत्यादिंसह व महीलांनी डोक्यावर तुळस घेऊन सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.