बागेश्री श्रीलंकेच्या मार्गावर

27 Jun 2023 12:51:46


bageshri



मुंबई (प्रतिनिधी): कोकण किनारपट्टीवर टॅग केलेले बागेश्री हे कासव आता श्रीलंकेच्या पाण्यामध्ये असल्याचे लक्षात आले आहे. श्रीलंकेची आर्थिक राजधानी कोलंबो पासुन बागेश्री आता अवघ्या १५० किलोमिटरच्या अंतरावर आहे. तर, गुहाने गेल्या दहा दिवसांत २५० किलोमिटरचे अंतर कापले असुन ती दक्षिणेकडे प्रवास करत आहे.



turtle tag


काही दिवसांपुर्वी केरळाच्या किनाऱ्यांवर असलेल्या बागेश्रीने रत्नागिरीहुन थेट श्रीलंकेपर्यंतचा प्रवास कापलाय. रत्नागिरीतील गुहागरच्या किनारी बागेश्री आणि गुहा या दोन कासवीनींना सॅटेलाईट टॅग लावण्यात आले होते. भारताच्या दक्षिण टोकाकडे सुरु असणारा या दोन्ही कासविणींचा प्रवास अतिशय उत्सुक्तापुर्ण राहिला आहे. बागेश्री झपाट्याने प्रवास करत असुन तिने याआधी कर्नाटका, केरळ अंतर कापत आता श्रीलंका गाठण्याच्या तयारीत आहे.



गुहाचा प्रवास तुलनेने सावकाश होत असला तरी ती कर्नाटका पार करत आता लक्षद्विपमधील कडमाट बेट आता जवळ करते आहे. या बेटापासुन ती अवघ्या ३५ किलोमिटरच्या अंतरावर आहे. बागेश्री ही आता आणखी पुढे प्रवास करत ते श्रीलंकेचा किनारा लवकरच जवळ करेल असे दिसते.



Powered By Sangraha 9.0