घाटकोपर इमारत दुर्घटनास्थळी पालकमंत्री मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट!

    26-Jun-2023
Total Views |


Ghatkopar  
 
 
घाटकोपर: पहिल्या पावसामुळे २५ जून २०२३ रोजी सकाळी ९;३० वाजता घाटकोपर पूर्व येथील राजावाडी कॉलनी मध्ये एक जुनी तीन मजली इमारत जमिनीत धसली. अपघातानंतर अग्निशमन दल, पोलीस, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, NDRF ची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि बचाव कार्य सुरु झाले.
 

Ghatkopar  
 
या वेळी मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा घटनास्थळी उपस्थित होते. शासनातर्फे बचाव कार्यासाठी आवश्यक सर्वतोपरी मदत पुरवली जात असल्याची त्यांनी काळजी घेतली आणि यंत्रणांना आघाताबाबतची सर्व तपासणी करण्याचे आदेश दिले.
 
अपघातानंतर सुमारे १२ तासापेक्षा जास्त काळ बचाव कार्य सुरु होते. दुर्दैवाने या अपघातात इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकून दोन जणांचा मृत्य झाला तर तर चार जणांना गंभीर दुखापत झाली. जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
 

Ghatkopar  
 
"झालेली घटना अतिशय दुर्दैवी असून पीडित कुटुंबांच्या दुःखात मी सहभागी आहे. या बाबतची सर्व तपासणी सुरु असून देण्यात पुढे अश्या घटना होऊ नये यासाठी शासन यंत्रणा तत्परतेने कार्यरत आहेत. अतिवृष्टीच्या काळात नागरिकांनी स्वतःची सर्वतोपरी काळजी घ्यावी आणि सरकारी यंत्रणांना सहकार्य करावे." असे आवाहन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी केले.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.