५ तासांच्या प्रयत्नांनतर बिबट्याचे यशस्वी रेस्क्यु

24 Jun 2023 13:15:58

leopard rescue

मुंबई (विशेष प्रतिनिधी): जुन्नर तालुक्यातील ओतुर वन परिक्षेत्रात असलेल्या निमगाव सावा गावात दि. २३ जून रोजी विहिरीत अडकलेल्या बिबट्याचे सुरक्षितपणे रेसक्यु केले गेले. महाराष्ट्र वन विभाग आणि वाईल्डलाईफ एसओएस या संस्थेच्या एकत्रित प्रयत्नांतुन ३० फुट खोल विहिरित अडकलेल्या या बिबट्याचे पाच तासांच्या अथक प्रयत्नांनतर रेसक्यू ऑपरेशन पुर्ण झाले.




leopard rescue
साधारण ८- १० वर्षे वयाचा हा नर बिबट्या असुन तो रात्रीच्या वेळी विहिरीत पडल्याची शक्यता वर्तवली गेली आहे. सकाळी ७:३०च्या सुमारास आपल्या विहिरीत बिबट्या असल्याचे वसंत गाडगे या स्थानिक शेतकऱ्याने वन विभागाला कळवले. वन विभाग आणि वाईल्डलाईफ एसओएसची टीम तत्काळ अर्ध्या तासात घटनास्थळी पोहोचली. बचावासाठी दोरी, पिंजरा व इतर वस्तु घेऊन दाखल झालेल्या टीमने रेस्क्यु ऑपरेशनला तत्काळ सुरुवात केली. दोरीच्या सहाय्याने पिंजरा विहिरीत अलगद सोडत ३ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या बिबट्याला सुखरुप बाहेर काढले गेले. वाईल्डलाईफ एसओएस संस्थेच्या पशुवैद्यांनी या बिबट्याचे चेकअप केले असता त्याच्या अंगावरील काही ओरखड्यांमुळे त्याने स्वतःच्या बचावासाठी अनेक प्रयत्न केल्याचे लक्षात आले. वाईल्डलाईफ एसओएसच्या वैद्यकीय तपासणी नंतर या बिबट्याला वन विभागाकडे सुपुर्द करण्यात आले. प्रौढ नर बिबट्याला वन विभागाकडुन पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.


kakde RFO




Powered By Sangraha 9.0